आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suspense In The Name Of The Winner Of Khatron Ke Khiladi

खतरों के खिलाडी-5: विजेत्याच्या नावावर सस्पेंस, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'खतरो के खिलाडी'च्या मागील सर्व पर्वात शेवटच्या टप्यात पोहोचलेले स्पर्धकांमध्ये शेवटचा टास्क खेळला जात होता. त्यानंतर विजेत्याची घोषणा केली जात होती. परंतु यावेळी जरा वेगळेच सुत्र दिसून येत आहेत. यावेळी असे होणार नसल्याचे सांगितले जात आहे. 5व्या पर्वात निर्मात्यांनी ठरवले आहे, की फायनलिस्टलासुध्दा विजेत्याचे नाव सांगण्यात येणार नाहीये.
कार्यक्रमाच्या संबंधीत एका सुत्राने सांगितेल, 'हा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात येणार आहे. निकितिन धीर, गुरमीत चौधरी आणि रजनीश दुग्गल हे शेवटच्या फेरीत पोहोचले आहेत. मागील पर्वांपर्यंत विजेत्याचे नाव सांगण्यासाठी सर्वांना एकत्र येण्यास सांगितले जात होते. परंतु यावेळी असे म्हटले जात आहे, की विजेत्याचे नाव भारतात आल्यानंतर घोषित केले जाणार आहे आणि स्पर्धकांनासुध्दा याविषयी सुचना दिल्या जाणार आहेत.'
फायनलपूर्वी शोच्या बाहेर झालेल्या एका स्पर्धकाने सांगितले, की शोमध्ये सहभाग घेण्यासाठी मिळणारे मानधनसुध्दा अद्याप पूर्ण दिले गेलेले नाही. त्याने सांगितले, 'शोचा होस्ट रोहित शेट्टीसह आम्हा सर्वांना गुपित ठेवण्यास सांगितले आहे. आम्हाला सर्व पैसे शो संपल्यानंतरच दिले जाणार आहेत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या शोच्या विजेत्यांचे नाव का होत नाहीये घोषित?