आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी ओमने ओलांडली मर्यादा, स्पर्धकांवर फेकली लघवी, बिग बॉसने केली घरातून हकालपट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वामी ओमला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. - Divya Marathi
स्वामी ओमला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे.
मुंबई: स्वामी ओम  बिग बॉसच्या दहाव्या पर्वातील सर्वात वादग्रस्त स्पर्धक ठरला आहे. अलीकडेच आलेल्या वृत्तानुसार, बिग बॉसच्या घरात स्वामीने केलेल्या गैरवर्तनामुळे त्याची घरातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  
 
स्वामीने बानीवर फेकली लघवी...  
- या आठवड्यात कॅप्टनसीसाठी विजे बानी आणि स्वामी ओम यांच्यामध्ये सामना झाला. 
- टास्कच्या वेळी स्वामीने सर्व मर्यादा ओलांडत एका मगमध्ये लघुशंका केली आणि नंतर ती चक्क बानीच्या अंगावर फेकली.  
- स्वामी ओमच्या या गैरवर्तनामुळे घरामधील सर्व सदस्य स्वामीवर प्रचंड वैतागले. 
- सर्वांनी स्वामीला बळजबरीने तुरुंगात बंदिस्त केले आणि त्याच्याविरोधात बिग बॉसकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली.  
- या सर्व गोंधळामुळे शेवटी स्वामीला घरातून काढण्यात आले. 
 
शिवीगाळ आणि गोंधळ करण्यात सगळ्यात पुढे होते स्वामी ओम... 
- सीजनच्या सुरुवातीपासूनच स्वामी ओम त्याच्या विचित्र वागण्यामुळे  घरातील सर्वाना त्रास देत होता. 
- स्पर्धकांच्या कुटुंबाविषयी आणि कॅरेक्टेरविषयी अनेकदा त्याने अपशब्दांचा वापर केला होता.  
- मोनालिसा, विजे बानी, रोहन मेहरा, लोपामुद्रा राऊत यांच्यापासून  ते घरात प्रत्येक सदस्यांविषयी स्वामी ओमने शिवराळ भाषेचा वापर केलाय.   
- स्वामीच्या अशा असंबंद्ध बडबडीमुळे दोन आठवड्यापूर्वी सलमानने त्याचे तोंड कापडाने बंद केले होते. 

यापूर्वीही स्वामीने केली होती खुलेआम टॉयलेट,वाचा पुढील स्लाईडवर... 
बातम्या आणखी आहेत...