आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वामी ओम असा वागला की सलमान भडकला, शो सोडून निघून गेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्वामी जेव्हापासून बिग बॉसच्या घरात आला आहे तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत राहतो. शनिवारी त्याने असेल काही विचित्र केले आणि सलमान चांगलाच भडकला. त्याला एवढा राग आला, की तो सेट सोडून निघून गेला. या अॅपिसोडच्या सुरवातीला सलमानने सर्वांना विचारले की खलनायकच्या खुर्चीवर कुणाला बसवायला हवे. त्यावर सर्वांनी स्वामी ओमचे नाव घेतले.
सलमानला केले नाराज तर स्वामीवर भडकले सगळे
सलमानने स्वामी ओमला विचारले, की काय कारण असेल की सर्वांनाच असे वाटते की तू खलनायच्या खुर्चीवर बसावे... त्यावर स्वामी म्हणाला, की सर्वांनी माझ्याविरुद्ध कट केला असेल... त्यानंतर सलमानने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो काही एक ऐकून घेत नव्हता. आपलाच मुद्दा समोर मांडत होता.
अखेर सलमान भडकला. म्हणाला, की तुम्हीच बोलत राहा. आणि सेट सोडून निघून गेला. दरम्यान, सलमानने अशा प्रकारे नाराज होणे इतर कंटेस्टंटना बरोबर वाटले नाही. आम्ही सात दिवस सलमानची वाट बघितली. त्यांच्याकडून काही शिकायला मिळेल, असे वाटले होते असे कंटेस्टंटनी सांगितले. पण स्वामीमुळे हेही शक्य होत नाही.
गौरव-बानीचे कडाक्याचे भांडण
बिग बॉसच्या घरात मित्र म्हणून राहत असलेले गौरव चोपडा आणि बानी यांचे कडाक्याचे भांडण झाले. अॅग्रेसिव्ह न होता थंड डोक्याने बोलत जा असे गौरवने बानीला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावर बानी भडकली. गेल्या 40 दिवसांपासून मी तुझ्यासोबत थंड डोक्याने बोलत आहे. तरीही तू मला अॅग्रेसिव्ह म्हणतोय याचा बानीला राग आला होता. बानीने सांगितले, की मी अशीच बोलते. अशीच बोलत राहील. जर तुला आवडत नसेल तर माझ्याशी बोलू नकोस.
पुढील स्लाईडवर बघा, शनिवारच्या अॅपिसोडचे काही फोटो....
बातम्या आणखी आहेत...