आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Swapnil Joshi New Serial Golmal Hai Bhai Sab Golmal Hai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता स्वप्नील करणार 'गोलमाल' !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता स्वप्नील जोशीची 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका येत्या २५ ऑगस्टला आपला निरोप घेत आहे. मात्र ही मालिका निरोप घेत असली तरीदेखील स्वप्निल रोजच त्याच्या नव्या मालिकेच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. लग्नाची दुसरी गोष्ट सांगितल्यानंतर आता स्वप्निल आपल्याला गोलमाल करताना दिसेल. स्वप्निल ही गोलमाल करणार आहे सब टीव्हीवर. एक धमाल कॉमेडी मालिकेत स्वप्निल जोशी लीड रोल मध्ये असून त्याची ही मालिका येत्या १३ ऑगस्टपासून सुरु होत आहे. स्वप्निलच्या या नवीन मालिकेचे नाव आहे 'गोलमाल है भाई सब गोलामाल है'. या मालिकेत आपल्याला थ्री डी फॅमिली पाहायला मिळणार आहे. या थ्रीडी चा अर्थ म्हणजे धनवंतरीलाल ध्यानचंद ढोलकिया असा आहे. ही फॅमिली आपल्याला पोटधरुन हसवणार आहे. या मालिकेत स्वप्नील जोशीबरोबर टिकू तल्सानिया, मुग्धा चाफेकर आणि अपरा सेनही या महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

'गोलमाल है भाई सब गोलमाल है' ही मालिका ऋषिकेश मुखर्जी यांच्या गोलमाल चित्रपटाप्रमाणेच विनोदी असल्याचे सब टीव्हीचे कार्यकारी व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड अनुज कपूर यांनी सांगितले.
२५ ऑगस्टला घना-राधा घेणार आपला निरोप
व्हिडिओ : घना-राधाची रोमॅण्टिक गोष्ट 'तुझ्या विना...'