आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारमध्ये झाडू-पोछा करण्यापासून ते पिझ्झा डिलिव्हरीपर्यंत, दिव्यांकाच्या पतीचा असा होता संघर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः TV अॅक्ट्रेस दिव्यांका त्रिपाठीचा नवरा आणि अभिनेता विवेक दहियाला आपण 'ये है मोहब्बतें' या मालिकेत एसीपी अभिषेकच्या भूमिकेत बघत आहोत. रिअल लाईफमधील विवेकच्या संघर्षाविषयी फारच क्वचित लोकांना ठाऊक आहे. विवेक अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, जो चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला नाही. तर अतिशय कठोर मेहनतीच्या बळावर त्याने आज यश मिळवले आहे. 

बारमध्ये केलंय झाडू-पोछा करण्याचे काम 
विवेकने झाड़ू-पोछा करण्यापासून ते घरी-घरी जाऊन पिझ्झा डिलिव्हरी करण्याचे काम केलंय. इंग्लंडमधून बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना याच क्षेत्रात नाव कमावण्याचे त्याने स्वप्न पाहिले होते. पण मॅनेजमेंटचे शिक्षण सुरु असताना विवेकने एक थिएटर ग्रुप जॉईन केला. थिएटरमध्ये नाटकात काम करत असताना त्याची रुची अभिनयाकडे अधिक वाढली आणि याच क्षेत्राकडे तो आकर्षित झाला. त्यानंतर मुंबईत परतून त्याने मॉडेलिंग सुरु केले आणि कधीही मागे वळून पाहिले नाही. संघर्षाच्या काळात विवेकने इंग्लंडमध्ये अनेकप्रकारची कामे केली.  

divyamarathi.com सोबत केलेल्या बातचीतमध्ये विवेक म्हणाला, इंग्लंडमध्ये घालवले दिवस आठवले, की मी नर्व्हस होतो. त्या दिवसांची आठवण झाली, की आज मी अतिशय चांगल्या पोझिशनवर असल्याचे वाटते. एका मिडल क्लास कुटुंबातून असल्याने माझे वडील कोर्सची फीस अफोर्ड करु शकत होते, पण तेथे राहण्याचा आणि खाण्यापिण्याच्या खर्चासाठी मला काम करणे गरजेचे होते.  

पुढे वाचा, वयाच्या 18 व्या वर्षी दिव्यांकाच्या नव-याला मिळाला होता बार टेंडरचा जॉब.. 
बातम्या आणखी आहेत...