आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 दिवसांपासून बेपत्ता आहे TV अभिनेता, बलात्काराच्या आरोपानंतर झाला होता जॉबलेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : विशाल ठक्कर - Divya Marathi
फाइल फोटो : विशाल ठक्कर
मुंबई- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिका आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमात काम केलेला अभिनेसा विशाल ठक्कर मागील 11 दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याची आई दुर्गा ठक्कर यांनी ही माहिती divyamarathi.comला दिली आहे. ऑक्टोबर 2015मध्ये विशालच्या गर्लफ्रेंडने त्याच्या बलात्काराचा आरोप लावला होता.
काय म्हणाली विशालची आई दुर्गा ठक्कर...
दुर्गा ठक्कर यांच्या सांगण्यानुसार, 'बलात्काराचा आरोप लागल्यानंतर विशाल तणावात होता. 31 डिसेंबरला मध्यरात्रीपर्यंत तो माझ्यासोबत होता. त्यानंतर सिनेमा पाहायला जातो, म्हणून निघून गेला. त्या रात्रीपासून अद्याप तो घरी आलेला नाहीये. तणावामुळे तो कोणतेही कॉन्ट्रॅक्ट करू शकत नव्हता. बलात्काराच्या आरोपानंतर तो जॉबलेस झाला होता. त्यामुळेसुध्दा तो तणावात गेला होता.'
बलात्कार प्रकरणाविषयी बोलल्या दुर्गा ठक्कर...
दुर्गा यांनी विशाल ठक्करवर लागलेल्या आरोपाविषयीसुध्दा बातचीत केली. त्यांनी सांगितले, 'काही दिवसांनंतर आपली चूक समजल्यानंतर त्या मुलीने तक्रार मागे घेतली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी काहीच फॉर्मेलिटीज बाकी होत्या. इतकेच नव्हे, या तक्रारीनंतर ती मुलगी सतत विशालच्या संपर्कात होती. परंतु माहित नाही माझा मुलगा कुठे आहे?'
पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली...
मुंबई पोलिसांनी विशाल बेपत्ता असल्याचे तक्रार नोंदवली असून विशालला शोधण्यास सुरुवात केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून, जाणून घ्या विशालने कोणत्या मालिका आणि सिनेमांत काम केले आहे...
बातम्या आणखी आहेत...