मुंबईः सब टीव्ही वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. या मालिकेच्या प्रसारणाला आठ वर्षे पू्र्ण झाली आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेने यशस्वी आठ वर्षांचा टप्पा पूर्ण केल्याच्या निमित्ताने सेटवर जल्लोषात सेलिब्रेशन झाले. शोचे लीड स्टार्स अर्थातच दिलीप जोशी (जेठालाल) आणि दिशा वाकाणी (दया बेन) यांनी निर्माता असित कुमारसोबत केक कापला.
28 जुलै 2008 रोजी ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली होती. गेल्या आठ वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत सामाजिक संदेश देण्याचेही काम केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'तारक मेहता..'च्या सेलिब्रेशनची छायाचित्रे...