आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दया भाभी घेणार \'तारक मेहता का उल्टा चश्मा\'मधून ब्रेक, हे आहे यामागचे खरे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे दिशा वाकाणी. ही मालिका सुरु झाल्यापासूनच दिशा या मालिकेचा भाग आहे. पण आता तुम्हाला 'दया भाभी'ला अर्थातच दिशाला मालिकेत पाहता येणार नाही.  मात्र दिशाच्या फॅन्सनी नाराज होण्याचे कारण नाही. कारण दिशा ही मालिका सोडणार नाही, तर ती फक्त काही महिन्यांपुरता मालिकेतून ब्रेक घेत आहे.
 
प्रेग्नेंट आहे दिशा..  
- दिशा गरोदर असल्याने काही काळासाठी ती मालिकेत दिसणार नसल्याचे समजते.
- दिशाने गेल्याच वर्षी मयुर पांड्या याच्याशी विवाह केला. त्यानंतर तिला आता पहिल्या बाळाची चाहूल लागली आहे. 
 
गरज भासल्यास शूटिंग करणार दिशा.. 
- वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दिशा शूटला अनुपस्थितीत राहतेय. तसेच, ती मॅटर्निटी लीव्हवर असल्याचे म्हटले जात आहे. 
- दिशाने तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सोडली नसून, ती फक्त काही दिवसांसाठी ब्रेकवर आहे.
- दिशाची अनुपस्थिती लक्षात घेता मालिकेच्या कथा लेखकांनीही त्याप्रमाणे पुढच्या भागांचे लेखन करण्यास सुरुवात केली आहे. 
- गरज असल्यास दिशा काही दृश्यांच्या चित्रीकरणासाठी येईल. दिशाने मालिकेच्या निर्मात्यांशी याबद्दल चर्चा केली असून, ते तिच्या जागी दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीला घेण्यास इच्छुक नाहीत. 
 
2015 मध्ये झाले दिशाचे लग्न... 
- 24 नोव्हेंबर 2015 रोजी दिशाने मुंबई बेस्ड चार्टर्ड अकाऊंटंट मयूर पांड्यासोबत लग्न केले.
- दिशाचा जन्म 17 सप्टेंबर 1978 रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. पण ती लहानाची मोठी भावनगरमध्ये झाली.
- शालेय जीवनापासूनच तिला अभिनयात रुची आहे. गुजरात कॉलेज, अहमदाबाद येथून तिने ड्रामॅटिक आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.
- दिशा 2008 पासून 'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेत काम करत आहे.
- याशिवाय ती 'खिचडी' (2004) आणि 'इंस्टंट खिचडी' (2005 ) या शोमध्येही झळकली. 
- टीव्ही मालिकांव्यतिरिक्त दिशाने बॉलिवूडमध्ये 'कमसिन : द अनटच्ड' (1997), 'फूल और आग' (1999), 'देवदास' (2002), 'मंगल पांडे : द राइजिंग' (2005), 'सी कंपनी' (2008) आणि 'जोधा अकबर' (2008) या सिनेमांमध्ये काम केले.
 
बातम्या आणखी आहेत...