आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Real Life मध्ये ग्लॅमरस आहे 'तारक मेहता...'ची माधवी भाभी, बघा कधीही न पाहिलेले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने स्वतःची एक वेगळी छाप सोडली आहे. मालिका जेठालालच्या कुटुंबीयांवर केंद्रित आहेत. मात्र इतर कुटुंबसुद्धा मालिकेतील अविभाज्य भाग आहेत. मालिकेत भिडे हे मराठी कुटुंबसुद्धा दाखवण्यात आले आहे. सेक्रेटरी भिडेच्या पत्नी माधवी भाभी म्हणून गोकुळधाम सोसायटीत फेमस आहेत. माधवी भाभी हे पात्र साकारले आहे मराठमोळ्या अभिनेत्रीने. या अभिनेत्रीचे नाव आहे सोनालिका जोशी. वरील छायाचित्रात सोनालिका मार्डन लूक लक्ष वेधून घेतोय. या फोटोत सोनालिका सिगारेटचे कश घेताना दिसतेय.
 
फोटोशूटमध्ये हातात पकडली सिगारेट...
मालिकेत नेहमी साडीत दिसणा-या सोनालिका जोशीने काही दिवसांपूर्वी एक ग्लॅमरस फोटोशूट करुन घेतले होते. या फोटोशूटच्या एका पोजमध्ये सोनालिकाच्या हातात सिगारेट दिसत असून तिचे केसरचनाही नेहमीपेक्षा वेगळी दिसतेय. तिचा हा लूक नक्कीच लक्ष वेधून घेणारा आहे.
 
मराठी अॅक्ट्रेस आहे सोनालिका जोशी...
सोनालिकाचा जन्म 5 जून 1976 रोजी झाला आहे. समीर जोशीसोबत सोनालिकाचे लग्न झाले असून ती मुंबईत स्थायिक आहे. तिला एक मुलगीसुद्धा आहे. मुलीचे नाव आर्या आहे. सोनालिकाने करिअरची सुरुवात रंगभूमीवरुन केली. काही मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे. शिवाय टीव्ही शोजमध्ये होस्टची भूमिकासुद्धा तिने बजावली आहे.

मालिकेत लोणची-पापड बनवते माधवी
तारक मेहता...च्या गोकुळधाम सोसायटीचे सेक्रेटरी आणि ट्युशन टीचर आत्माराम तुकाराम भिडे (मंदार चंदावडकर)ची पत्नी माधवी (सोनालिका जोशी) आणि त्यांची मुलगी सोनू भिडे (निधी भानूशाली) यांची केमिस्ट्री खूप लोकप्रिय झाली आहे. माधवी मराठी असल्याने मालिकेत तिने मराठी पात्र अतिशय छान रंगवले आहे. पापड आणि लोणची बनवून नव-याला आर्थिक मदत करणारी माधवी सोसायटीमधील मुलांची फेव्हरेट आहे.  

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, यापूर्वी कधीही न पाहिलेली सोनालिकाची खास झलक...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...