आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Real Family Members Of Star Cast

रिअल लाइफमध्ये विवाहित आहेत पत्रकार पोपटलाल, हे स्टार्सही आहेत मॅरिड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- श्याम पाठक पत्नी रश्मि मुलगा पार्थ आणि मुलगी नियतीसोबत)
मुंबई- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका आहे. या मालिकेला दया बेन अर्थातच दिशा वाकाणी आणि जेठालाल अर्थातच दिलीप जोशी यांच्या कॉमिक केमिस्ट्रीमुळे ओळखले जाते. परंतु यामध्ये एक पात्र असेही जे आपल्या लग्नाबाबत नेहमी हैराण असते. आम्ही पत्रकार पोपटलाल पांडेविषयी बोलत आहोत. या पात्राचे मूळ नाव श्याम पाठक आहे.
रील लाइफमध्ये लग्नासाठी मुलींच्या शोधात असलेले पोपटलाल रिअल लाइफमध्ये विवाहित आहेत. 2003मध्ये श्याम पाठक यांनी नवी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आपली वर्गमैत्रीण रश्मिसोबत लग्न केले. पोपटलाल सध्या दोन मुलांचे (मुलगी नियती आणि मुलगा पार्थ) वडील आहेत.

जास्तीत जास्त स्टार्स आहेत विवाहित-
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये काम करणारे अनेक स्टार्स विवाहित आहेत. जेठालाल अर्थातच दिलीप जोशी यांच्या रिअल लाइफ पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे. त्यांना दोन मुले (मुलगी नियती आणि मुलगा ऋत्विक) आहेत. जेठालालच्या बाबूजीचे पात्र साकारणारे अमित भट्ट असो अथवा गोकूलधाम सोसायटीचे सेक्रेटरी आत्माराम भिडेची भूमिका साकारणे मंदार चंदावडकर असो की वाघाच्या पात्रातील तन्मय वाकारिया असोत. या मालिकेतील सर्वाधिक पात्र ख-या आयुष्यात विवाहित आहेत.
diyamarathi.com आज तुम्हाला 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या पात्रांचे रिअल लाइफ मुले आणि पत्नी दाखवत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पात्रांचे रिअल कुटुंब...