आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Star Cast Changed During 6 Years

तारक मेहता का उल्टा चश्मा: पाहा गेल्या 6 वर्षांत किती बदलले हे स्टार्स, PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः टपू आणि गोगी)

सासासुनांच्या त्याच त्या रटाळ मालिकांपासून हटके असलेली एक वेगळ्या धाटणीची मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली आणि बघता बघता या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले. ही मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. 28 जुलै 2008 रोजी ही मालिका आपल्या भेटीला आली. विशेष म्हणजे आज (17 सप्टेंबर) ही मालिका यशस्वी 1500 एपिसोड्स पूर्ण करणार आहे.
गेल्या सहा वर्षांच्या काळात मालिकेतील अनेक कलाकार तेच आहेत. मात्र निर्मात्यांवर आत्तापर्यंत तीन वेळा मालिकेतील काही पात्र बदलण्याची वेळ आली आहे. मालिकेत जेठालालच्या दुकानात काम करणा-या नटुकाका अर्थातच घनश्याम नायक यांची बायपास सर्जरी झाल्यामुळे त्यांना मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला होता. त्यामुळे निर्माते दुकानात काम करण्यासाठी एका नव्या चेह-याच्या शोधात होते. या भूमिकेसाठी तन्मय वेकरियाची निवड करण्यात आली. आता ही भूमिका तन्मय साकारतोय.
तर सुरुवातीला 'हंसराज हाथी'ची भूमिका अभिनेता निर्मल सोनी करत होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी ही मालिका सोडली. आता ही भूमिका आजाद कवी साकारत आहे. तर 'रीटा रिपोर्टर'ची भूमिका सुरुवातीली प्रिया आहुजा करत होती. मात्र आता प्रियाच्या ऐवजी निधीची वर्णी लागली आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला गेल्या सहा वर्षांत मालिकेतील कलाकारांच्या लूकमध्ये झालेला बदल छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गेल्या सहा वर्षांत किती बदलले तुमचे हे लाडके कलाकार...