आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'तारक मेहता का उल्टा चष्मा\'च्या सेटवर झाला मृत्यू, जाणून घ्या काय घडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या सेटवर गुरुवारी एक दुःखद घटना घडली. गेल्या अनेक वर्षांपासून या मालिकेसाठी काम करणा-या एका खास व्यक्तीने गुरुवारी जगाचा कायमचा निरोप घेतला. या मालिकेचे हेड प्रॉडक्शन कंट्रोलर अरविंद मर्चंडे यांची 30 जून रोजी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने मालिकेच्या सेटवरच प्राणज्योत मालवली.

सविस्तर वृत्त असे, की ही घटना घडण्यापूर्वी अरविंद यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. मात्र अपचनामुळे छातीत दुखत असावे, असे त्यांना वाटले. त्यांनी त्यावरचे औषध घेऊन पुन्हा कामाला सुरुवात केली. मात्र अचानक दुखणे वाढले आणि सेटवरच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अरविंद यांच्या अकाली निधनाने कलाकारांवर शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर गुरुवारी आणि शुक्रवारी मालिकेचे शूटिंग बंद ठेवण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप द्यायला मालिकेचे सर्व कलाकार रुग्णालयात पोहोचले होते. 39 वर्षीय अरविंद यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

2008 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु झाली होती. सर्वाधिक काळ चालणारी विनोदी मालिका म्हणून या मालिकेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, अरविंद मर्चंदे यांची 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील कलाकारांसोबतची आता आठवणीतील छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...