(फाइल फोटोः डावीकडून, अँडी, एली, अरमान आणि तनिषा)
मुंबईः '
बिग बॉस-7'मध्ये स्पर्धक राहिलेले अरमान कोहली, तनिषा मुखर्जी, एली अवराम आणि व्हीजे अँडी यांनी शोचे नवीन सिझन बघण्यासाठी खास तयारी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चौघांनीही नवीन सिझनचा प्रत्येक एपिसोड एकत्र बसून बघण्याचा आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे ठरवले आहे.
ऐकिवात आहे, की ही गँग अरमानच्या जुहूस्थित घरी एकत्र येऊन शोची मजा घेणार आहे. 'बिग बॉस-7'मध्ये या चारही स्पर्धकांमध्ये चांगली बाँडिंग जमली होती. शो संपल्यानंतरसुद्धा या चौघांची मैत्री कायम आहे.
नोटः 'बिग बॉस'चा आठवा सिझन येत्या 21 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सलग पाचव्यांदा हा शो होस्ट करणार आहे.