आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तारक मेहता...’चा टप्पू अवतरला शिवाजी महाराजांच्या रुपात, हे आहे यामागचे खास कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत लवकरच प्रेक्षकांना गणेशोत्सवाची धूम बघायला मिळणार आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाच्या निमित्ताने टप्पूने शिवाजी महाराजांचे रुप धारण केले आहे तर त्याची सेना मराठा योद्धा बनली आहे. नाच-गाणी आणि उत्साहाच्या वातावरणात गोकुळधाम सोसायटीत बाप्पाचे आगमन होणार आहे. येत्या 4 सप्टेंबरपासून या मालिकेत गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. 
 
यंदाच्या वर्षी गोकुळधाम सोसायटीत पुण्याच्या दगडुशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीची स्थापना करण्यात येणार आहे. या स्पेशल एपिसोडविषयी मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी म्हणाले, "महाराष्ट्रातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला यावर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने टप्पू शिवाजी महाराज बनला आहे तर त्याची सेना मराठा योद्धा बनून गणपती बाप्पांना वाजत-गाजत गोकुळधाममध्ये घेऊन येणार आहेत." 

गोकुळधाममध्ये नेहमीच अनोख्या पद्धतीने सण साजरे होत असतात. त्यामुळे गणेशोत्सवसुद्धा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे. जुलै 2008 पासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.   

पुढील स्लाईडवर बघा, टप्पू आणि त्याच्या सेनेचा खास फोटो... 
बातम्या आणखी आहेत...