आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा 'तारक मेहता...'मधील बबिताच्या मिस्टर अय्यरला, जेठालालमुळे असतो नेहमी त्रासलेला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः बबिता उर्फ मुनमुन दत्तसह अभिनेता तनुज महाशब्दे)

मध्यप्रदेशने अभिनय जगताला अनेक कलाकार दिले. असाच एक अभिनेता म्हणजे तनुज महाशब्दे. अनेक मालिकांमध्ये तनुज झळकला आहे. मात्र त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेमुळे. या मालिकेत तनुजने कृष्णन सुब्रमण्यम अय्यरची भूमिका साकारली आहे. मालिकेत कृष्णन दाक्षिणात्य असून बबिता त्याची पत्नी आहे. यामध्ये तो सायंटिस्ट आहे.
आज या मालिकेचा 1500वा भाग प्रसारित होणार आहे. सब टीव्ही वाहिनीवर 28 जुलै 2008 रोजी ही मालिका दाखल झाली. 2008 पासून सुरु झालेला या मालिकेचा प्रवास आजही यशस्वीरित्या सुरु असून 1500 एपिसोड्सचा यशस्वी टप्पा या मालिकेने गाठला आहे.
मालिकेत जेठालाल आणि दया भाभीनंतर मिस्टर अय्यर आणि त्याची पत्नी बबिता अय्यर यांच्या मुख्य भूमिका आहेत. जेठालाल मिस्टर अय्यरची पत्नी बबितावर फिदा असतो. त्यामुळे अय्यर जेठालालमुळे नेहमी अस्वस्थ असतो.

आज आम्ही तुम्हाला मिस्टर अय्यर अर्थातच तनुज महाशब्देविषयी सांगत आहोत..

देवासमध्ये झाला जन्म...
तनुजचा जन्म 24 जुलै 1974 रोजी मध्यप्रदेशातील देवास येथे झाला. इंदोरमधून तनुजने अभिनयाला सुरुवात केली. येथील भारती विद्या भवन कला केंद्रामध्ये तो नाटकात काम करत होता. त्यानंतर तनुजने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेमुळे तनुज प्रसिद्धीझोतात आला आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील मिस्टर अय्यरची खास छायाचित्रे...