आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा \'तारक मेहता\'मधील मिस्टर अय्यर, जेठालालमुळे असतो नेहमी त्रासलेला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यप्रदेशने अभिनय जगताला अनेक कलाकार दिले. असाच एक अभिनेता म्हणजे तनुज महाशब्दे. अनेक मालिकांमध्ये तनुज झळकला आहे. मात्र त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळे. या मालिकेत तनुजने कृष्णन सुब्रमण्यम अय्यरची भूमिका साकारली आहे. मालिकेत कृष्णन दाक्षिणात्य असून बबिता त्याची पत्नी आहे. यामध्ये तो सायंटिस्ट आहे.
सब टीव्हीवर प्रसारित होणारी ही विनोदी मालिका 28 जुलै 2008 रोजी सुरु झाली. 2008 पासून सुरु झालेला या मालिकेचा प्रवास आजही यशस्वीरित्या सुरु आहे. मालिकेत जेठालाल आणि दया भाभीनंतर मिस्टर अय्यर आणि त्याची पत्नी बबिता अय्यर यांच्या मुख्य भूमिका आहेत. जेठालाल मिस्टर अय्यरची पत्नी बबितावर फिदा असतो. त्यामुळे अय्यर जेठालालमुळे नेहमी अस्वस्थ असतो.
आज आम्ही तुम्हाला मिस्टर अय्यर अर्थातच तनुज महाशब्देविषयी सांगत आहोत..
देवासमध्ये झाला जन्म...
तनुजचा जन्म 24 जुलै 1974 रोजी मध्यप्रदेशातील देवास येथे झाला. इंदोरमधून तनुजने अभिनयाला सुरुवात केली. येथील भारती विद्या भवन कला केंद्रामध्ये तो नाटकात काम करत होता. त्यानंतर तनुजने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील मिस्टर अय्यरची खास छायाचित्रे...