आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही शोच्या सेटवर रणवीर-दीपिका, काहीशा अशा अंदाजात केले 'बाजीराव...'चे प्रमोशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सध्या रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण हे दोन स्टार्स 18 डिसेंबरला रिलीज होत असलेल्या त्यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अलीकडेच ही जोडी छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या 'स्वरागिनी'च्या सेटवर पोहोचले. येथे त्यांनी स्पेशल एपिसोडचे शूटिंग केले. रणवीरने शूटिंगदरम्यान 'मल्हारी...' या गाण्यावर ठेका धरला. शिवाय शोचे लीड स्टार्स स्वरा (हेली शाह) आणि राम (वरुण कपूर) यांचा गुंडांपासून बचाव केला.
टोंगळ्यावर बसून दीपिकाला केले प्रपोज
शूटिंगवेळी रणवीर आणि दीपिकाची रोमँटिक केमिस्ट्री स्पष्ट झळकत होती. फोटोग्राफर्ससमोर रणवीरने टोंगळ्यांवर बसून दीपिकाच्या हाताचे चुंबन घेतले. स्पेशल एपिसोडच्या शूटिंगसाठी रणवीरने ग्रीन-गोल्डन शेरवानी तर दीपिकाने डिझायनर अंजू मोदीची एलिगेंट साडी परिधान केली होती.
पुढे पाहा, मालिकेच्या सेटवर क्लिक झालेली रणवीर-दीपिकाची ही खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...