आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teejay Is Not Upset With Karanvir’S Love Making Scene With Vedita

टीव्ही स्टार करणवीर बोहराची पत्नी म्हणाली, 'पतीच्या लव्ह मेकिंग सीन्सने नाराज नाही'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('मुंबई 125 किमी:' सिनेमाच्या एका सीनमध्ये वेदिता प्रतापसह करणवीर बोहरा)

मुंबई:
टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा 'मुंबई 125 किमी:' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा एक 3D हॉरर सिनेमा आहे. त्यात वीणा मलिक आणि वेदिता प्रताप सिंहची मुख्य भूमिका आहे. अशा बातम्या आल्या होत्या, की सिनेमामध्ये वेदितासह लव्ह मेकिंग सीन्स दिल्याने करणवीरची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री टीजे सिध्दू नाराज आहे. परंतु स्वत: टीजेने अशा चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.
Divyamarathi.Comसोबत बातीचीत करताना टीजेने सांगितले, 'वेस्टर्न बॅकग्राउंडशी माझा संबंध आहे. मला माहित आहे, की सिनेमांमध्ये काही बोल्ड सीन्स द्यावे लागतात. याविषयी मी का नाराज होऊ? करणवीरने याविषयी मला पूर्वीच सांगितले होते. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही एकमेकांना मागील 10 वर्षांपासून ओळखतो. मला आनंद आहे, की तो त्याच्या करिअरमध्ये पुढे जात आहे. मी त्याला पूर्ण पाठिंबा देणार आहे. अशा अफवांचा आमच्या नात्यावर काहीच फरक पडणार नाहीये.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'मुंबई 125 किमी:'मधील करणवीर, वेदिता प्रताप आणि वीणा मलिक यांची झलक छायाचित्रांमध्ये...