अविका गौर आपल्या सहकलाकारांसह...
मुंबई - टीव्ही अभिनेत्री अविका गौरने 30 जून रोजी आपला 17वा वाढदिवस साजरा केला. अविकाने यंदाचा आपला वाढदिवस युवा भारत एक्स्प्रेस मॅगझिनच्या टीमसह साजरा केला. या पार्टीत अविकाच्या मित्रांसह तिचे सहकलाकार आणि कुटुंबीय सहभागी झाले होते.
टीव्ही अभिनेत्री म्हणून यशस्वी ओळख निर्माण करणारी अविका 'उयाला जम्पाला' या तामिळ सिनेमातसुद्धा झळकली आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अविका म्हणाली, ''माझ्यासाठी हा दुहेरी आनंद आहे. माझा यंदाचा वाढदिवस माझ्या सिनेमाच्या रिलीजवेळी आला आहे. मी उत्साही आणि नर्व्हससुद्धा आहे. माझा आगामी सिनेमा एक लव्ह स्टोरी आहे. या सिनेमात मी 17 वर्षीय तरुणीची भूमिका साकारत असून ती आपल्या भविष्याविषयी खूप जागरुक असते.''
छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' या मालिकेमुळे अविका गौरला ओळख प्राप्त झाली. सध्या ती 'ससुराल सिमर का' या मालिकेच रोलीचे पात्र साकारत आहे. 2008 पासून अविकाने अभिनयाला सुरुवात केली. हिंदी, तेलगू आणि कन्नड सिनेमांमध्ये तिने अभिनय केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अविकाच्या वाढदिवसाची खास छायाचित्रे...