आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 TV अॅक्ट्रेसेस: कुणाला Ex-हसबंडने तर कुणाला बॉयफ्रेंडने केली मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचा पुर्वाश्रमीचा नवरा राजा चौधरीच्या मते, तो आता पुर्वीपेक्षा खूप बदलला आहे. आता आपण पुर्वीसारखे रागिट नसल्याचे तो म्हणतोय. राजा चौधरीने १९९८ मध्ये श्वेता तिवारीसोबत लग्न केले होते. मात्र २००७ मध्ये दोघे विभक्त झाले. २०१२ मध्ये दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला. राजा चौधरी याने कार्यक्रमाच्या सेटवर पैशासाठी धुडगूस घालण्यास सुरुवात केल्यानंतर श्वेता तिवारीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. श्वेताच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे राजाच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता. श्वेता ही मुलगी पलकसाठी राजाचे अत्याचार सहन करत होती. पण अखेर कंटाळून २००७ साली तिने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
आता श्वेताने अभिनेता अभिनव कोहली याच्याशी विवाह केला आहे. श्वेता आता गर्भवती असून लवकरच ती आपल्या दुस-या बाळाला जन्म देणारेय. घरगुती हिंसाचाराला बळी पडणारी श्वेता ही पहिली अभिनेत्री नव्हे. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी नवरा आणि बॉयफ्रेंडच्या घरगुती हिंसाचाराविरुद्ध लढा पुकारला होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, घरगुती हिंसाचाराला सामोरे गेलेल्या अभिनेत्रींविषयी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...