आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा पडदा: ‘सीआयडी’चे 16 व्या वर्षात पदार्पण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोळा वर्षांपासून आबालवृद्धांचे मनोरंजन करणा-या सोनी वाहिनीवरील गुन्ह्यांचा शोध लावणा-या ‘सीआयडी’ या मालिकेने दमदारपणे 16 व्या वर्षात पर्दापण केले असून शुक्रवारी या मालिकेचा 1001 वा भाग प्रसारित करण्यात आला.


मालिकेच्या यशानिमित्त मुंबईत एका शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांच्यासह मालिकेतील कलाकारांची उपस्थिती होती. या वेळी साटम म्हणाले, आमच्या मालिकेवर सोळा वर्षांपासून प्रेम करणा-या करोडो चाहत्यांचे मनापासून आभार. देशात घडणा-या गुन्ह्यांची माहिती ही पोलिसांत देणे अवघड काम आहे. मालिकेत आम्ही जसे दाखवतो त्याप्रमाणे वस्तुस्थिती नसते. तरीदेखील सीआयडीमुळे अनेक गुन्ह्यांची माहिती ही लोक आता पोलिसांत देत आहेत, हे आमच्या मालिकेचे यश आहे. आपण जसा विचार करतो तसे पोलिस नसतात. पोलिस दलात अनेक असे अधिकारी आहेत जे आपले काम अतिशय जबाबदारीने पार पाडतात. प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच हवी. त्यामुळे घडणारे गुन्हे हे चांगले नसतात, हे प्रेक्षकांना पटवून देणे अवघड काम असल्याचे ते म्हणाले. सीआयडीने 1 हजार भाग पूर्ण करणे ही अतिशय सुखद बाब असून यात काम करणे हे माझे सौभाग्य समजतो, असेही साटम यांनी सांगितले.


औरंगाबादेतही चित्रीकरण
या मालिकेचे औरंगाबाद येथील टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस, निराला बाजार, आर्ट कॉलेज आणि इतर भागात चित्रीकरण करण्यात आले होते. त्या वेळी औरंगाबादकरांनी सीआयडी टीमला प्रचंड प्रतिसाद दिला होता.


कुछ तो गडबड है
या मालिकेत शिवाजी साटम (एसीपी प्रद्मुम्न), दयानंद शेट्टी (दया), आदित्य श्रीवास्तव (अभिजित), नरेंद्र गुप्ता (साळुंखे), दिनेश फडणीस (फे्रडरिक) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मालिकेचा 1001 वा भाग रहस्यमय असलेल्या एका बेटावर चित्रित करण्यात आला आहे. एसीपी प्रद्मुम्न यांचा ‘कुछ तो गडबड है’ हा डायलॉग लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत लोकप्रिय आहे, हे या मालिकेचे यश आहे.