मुंबईत 23 ऑक्टोबरला 13वा इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड्स सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. फिल्म सिटीतील रिलायन्स स्टुडिओत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी या सोहळ्याला चारचाँद लावले.
रुस्लान, मुमताज, दीपिका सिंह, हिना खान, देवोलिना भट्टाचार्य, परिधी शर्मा, संजीदा शेख, लॉरेन गेट्लिब, मुक्ती मोहन, एजाज खान, जय भानूशाली, दिशा परमार, कपिल शर्मा या सेलिब्रिटींनी आपल्या धमाकेदार सादरीकरणाने सोहळ्यात रंग भरले.
या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी कपिल शर्मा, करण सिंह ग्रोवर आणि रागिनी खन्ना यांनी सांभाळली. कपिलच्या विनोदाने प्रेक्षक पोटधरुन हसले.
या अवॉर्ड सोहळ्यात कपिलच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कार्यक्रमाने दोन अवॉर्ड आपल्या नावी केले. बेस्ट कॉमेडी शो आणि बेस्ट अॅक्टर कॉमेडी हे दोन अवॉर्ड कपिलच्या शोला मिळाले. तर करण सिंह ग्रोवरला 'कुबूल है' या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 'जोधा अकबर' ही सर्वोत्कृष्ट मालिका ठरली. हा अवॉर्ड घेण्यासाठी एकता कपूर आणि जितेंद्र या कार्यक्रमात हजर होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा या इवेंटची खास छायाचित्रे...