आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्रिश-4’ असेल राकेश रोशन यांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राकेश रोशन यांनी शनिवारी मुंबईमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात ‘क्रिश फ्रँचायझी’बाबत चर्चा केली. त्यांनी सांगितले की, सध्या या फ्रँचायझीसोबत पुढे जाणार नाही. त्यांचा आगामी चित्रपट एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा असणार आहे. यानंतर ते ‘4-क्रिश’ चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. याबाबत सविस्तर बोलताना राकेश रोशनने सांगितले की, ‘आता मी एक नॉन- क्रिश चित्रपट बनवणार असून त्यानंतर ‘क्रिश-4’ चित्रपटाची निर्मिती करणार आहे. पण मी हा चित्रपट प्रामाणिकपणे बनवण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी मला थोडासा वेळ देण्याची आवश्यकता आहे.
पुढे रोशन म्हणाले की, ‘क्रिश-4’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट असून चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान मी स्वत: लक्ष देणार आहे. ‘क्रिश-3’ चित्रपटाचा अंतिम आकडा 229 कोटींवर गेला आहे. रोशनने कलेक्शनबाबत आनंद व्यक्त केला. मी ‘क्रिश-3’ चित्रपटाच्या कलेक्शनबाबत खुश आहे. मात्र, ज्या वेळी चित्रपट महिना उलटून गेला तरी चित्रपटगृहात चालत असायचा ते दिवस मी मला आठवतायत. आता चित्रपटाची निर्मिती करताना फार मोठा दबाव जाणवतो. कारण एक सुपरहिट चित्रपट जास्तीत जास्त तीन आठवडेच चित्रपटगृहात चालतो.