आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी छोटा पडदा गाजवणा-या या अभिनेत्रीला थायरॉईड आजारामुळे सोडावे लागले करिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळी छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री जुही परमार ब-याच दिवसांनी अलीकडेच गोल्ड अवॉर्ड सोहळ्यात दिसली. यावेळी जुही खूप बदलेली दिसली. जुही बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची विजेती आहे.
जुहीला थायरॉईड हा आजार जडला असून त्यामुळे तिचे वजन झपाट्याने वाढत चालले आहे आणि आवाजातही फरक जाणवतोय. आता जुहीला एक मुलगी असून तिने अभिनयाला रामराम ठोकला आहे.
कोण आहे जुही परमार
14 डिसेंबर 1980 रोजी उज्जैनमध्ये जुहीचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर तिचे कुटुंब राजस्थानमध्ये स्थायिक झाले. जुहीला बालपणापासूनच म्युझिक आणि डान्समध्ये रुची होती. तिने मिस राजस्थानचा खिताब आपल्या नावी केला आहे. अभिनयात करिअर करण्यासाठी जुही राजस्थानमधून मुंबईत दाखल झाली. 'वोह' या मालिकेत तिला पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. मात्र या मालितून जुही स्वतःची ओळख निर्माण करु शकली नाही. त्यानंतर तिला कुमकुम ही मालिका मिळाली. या मालिकेमुळे जुही स्टार बनली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेसाठी जुहीने अनेक अवॉर्ड्स आपल्या नावी केले.
विशेष म्हणजे जुहीने 'से शावा शावा' या पाकिस्तानी मालिकेतसुद्धा अभिनय केला आहे. मालिकेसोबतच हंस बलिए, सास वर्सेस बहू, कॉमेडी सर्कस 2 या रिअॅलिटी शोमध्येही काम केले. बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची ती विजेती ठरली.
15 फेब्रुवारी 2009 रोजी जुहीने टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफसह लग्न केले. पाच महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर हे दोघे लग्नगाठीत अडकले. 27 जानेवारी 2013 रोजी जुहीने मुलीला जन्म दिला. समायरा हे तिच्या मुलीचे नाव आहे.
थायरॉईड आजारामुळे सोडावे लागले करिअर
जुहीचे वजन झपाट्याने वाढत चालले आहे. लग्नानंतर झपाट्याने वाढत चाललेले वजन बघता जुहीने डॉक्टरांशी संपर्क साधला. तपासणीदरम्यान तिला थायरॉईड असल्याचे निदान झाले. जुहीचे वजन आता 71 किलो आहे. जुहीने आता काम थांबवले असून वजन कमी करण्यासाठी सध्या ती स्ट्रिट डाएट आणि किक बॉक्सिंगकडे लक्ष देत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा वाढलेल्या वजनामुळे किती बदल झाला जुहीमध्ये...