आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेपाळची तेरिया मगर ठरली 'DID'ची विजेती, ट्रॉफीसोबत मिळाले 10 लाख रुपये बक्षीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(DIDच्या मंचावर परफॉर्म करताना तेरिया मगर)

मुंबई- नेपाळची तेरिया मगर झी टीव्ही या चॅनलवरील 'डान्स इंडिया डान्स, लिटल मास्टर्स' या रिअ‍ॅलिटी शोच्या तिसऱ्या पर्वाची विजेती ठरली आहे. शनिवारी रात्री पुण्यातील बालेवाडी कॉम्प्लेक्स येथे झालेल्या ग्रॅंड फिनालेदरम्यान हार्दिक रूपारेल, अनुष्का छेत्री आणि सद्विन शेट्टी यांना अंतिम फेरीत हरवुन तिने शोचे विजेतेपद आपल्या नावावर केले. तिला ट्रॉफी आणि 10 लाख रुपये रक्कम बक्षीसाच्या स्वरुपात देण्यात आले.
तेरिया नेपाळच्या रूद्रपुरची रहिवासी आहे. 'डान्स इंडिया डान्स'चे विजेतेपद घोषित झाल्यानंतर तिने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, "मला आज ही ट्रॉफी जिंकून खुप आनंद झाला आहे. आज डान्स इंडिया डान्सच्या स्टेजवर परफॉर्म करून, या शोचे विजेतेपद मिळवण्याचं माझं स्वप्न खरं झालं. सगळ्या मास्टर्स आणि प्रेक्षकांकडून मला सहकार्य मिळालं. त्यांनी नेहमीच माझ्या परफॉर्मन्सेसना प्रोत्साहन दिलं."
यावेळी वरुण धवन डीआयडीच्या फायनलमध्ये उपस्थित होता. त्याने 'मैं तेरा हीरो...', 'सॅटरडे, सॅटरडे...' आणि 'डिस्को दीवाने...' सारख्या ब्लॉकबस्टर गाण्यांवर डान्स करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले, तसेच शोचे ग्रॅण्डमास्टर मिथुन चक्रवर्ती आणि जजेस गीता कपूर आणि अहमद खान यांनी तेरियाला ट्रॉफी प्रदान केली. यावेळी मिथुन दा यांनी तेरीयाला शुभेच्छा दिल्या आणि तिच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं.