आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terms And Conditions To Entry In Bigg Boss House

Ex-स्पर्धकांनी सांगितले होते, \'Bigg Boss\'मध्ये एंट्री करण्यापूर्वी ठेवल्या जातात या अटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-  वादग्रस्त रिअॅलिटी शो \'बिग बॉस\'च्या 9वे पर्व 11 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यावेळी शो डबल ट्रबल टॅग लाइनसह येत आहे. त्यामध्ये स्पर्धकांना जोड्यांमध्ये राहण्याची शक्यता आहे. स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी अनेक कठिण टास्क करावे लागतात. सोबतच त्यांना काही अटीसुध्दा मान्य कराव्या लागतात.
 
या अटी त्यांच्या करारात सामील असतात. अटी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा असतात. जसे, की स्पर्धकांकडून घरातील एखादी वस्तूचे नुकसान झाले तर त्यासाठी त्यांना 50 लाखांचा दंड भरावा लागतो. शिवाय, सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी स्पर्धक कुणालाही भांडू शकतात किंवा चिडवू शकतात. 
 
मागील वर्षी शोच्या काही एक्स-स्पर्धकांनी करार अॅग्रीमेंट होणारे काही नियम आणि अटी divyamarathi.comसोबत शेअर केल्या आहेत. मात्र त्यांनी या अॅग्रीमेंटची कॉपी आम्हाला दाखवली नाही. परंतु जे सांगितले ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 
 
1. शो संपल्यानंतर स्पर्धक सांगू शकत नाहीत, की हे स्क्रिप्टेड होते. 
2. स्पर्धक बिग बॉसच्या प्रोडक्शनची प्रक्रिया कुणाला शेअर करू शकत नाहीत. 
3. एकदा घरात गेल्यानंतर स्पर्धक बाहेर येऊ शकत नाहीतजर असे झाले तर त्यांना दंड स्वरुपात एक कोटी रुपये चुकवावे लागतात. 
4. स्पर्धकाने घरात एखाद्या वस्तूचे नुकसान केले तर 50 लाख रुपये भरावे लागते. 
5. जर एखादा स्पर्धक भांडण, लव्ह मेकिंग इत्यादींच्या माध्यमातून मनोरंजन करत असेल तर त्याना साइनिंग अमाऊंटपेक्षा जास्त रक्कम मिळते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, बिग बॉसच्या इतर अटी... 
 
नोट: सर्व फोटो (\'बिग बॉस 8\'मधून)चा वापर सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.