आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डबाबंद होणार नाही कपिल शोचा शो, सलमान खानमुळे मिळाले दोन महिन्यांचे एक्सटेन्शन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सलमान खानमुळे 'द कपिल शर्मा' शोला दोन महिन्यांचे एक्सटेन्शन मिळाले आहे. एका रिपोर्टनुसार, या शोच्या जागी सलमानच्या 'दस का दम' या शोची वर्णी लागणार होती. पण सध्या सलमानचा शो येणार नाहीये. याचे कारण म्हणजे तो सध्या 'टायगर जिंदा है' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये तर 'ट्युबलाइट' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या हेक्टिक शेड्यूलमुळे त्याने 'दस का दम' हा शो दोन महिन्यांसाठी लांबणीवर टाकला आहे. 

वाहिनीने दिले होते एका महिन्याचे अल्टिमेटम...
- एप्रिल महिन्यात आलेल्या वृत्तानुसार, वाहिनीने कपिलला शोसाठी एक महिन्याचे अल्टिमेटम दिले होते. महिन्याभरात जर हा शो प्रेक्षकांना इम्प्रेस करण्यात मागे पडला, तर शो ऑफएअर करणार असल्याची वॉर्निंग वाहिनीने कपिलला दिली होती.  
- दरम्यान सलमान खान 'दस का दम' या शोचे तिसरे पर्व आणणार असल्याची चर्चा रंगली. हा शो कपिलच्या शोला रिप्लेस करणार आहे. 
- 2008 आणि 2009 साली 'दस का दम' या रिअॅलिटी शोचे दोन पर्व टेलिकास्ट झाले आहे. 

हळूहळू ट्रॅकवर येतोय शो... वाचा पुढील स्लाईडवर... 
 
बातम्या आणखी आहेत...