आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Kapil Sharma Show, SRK And Kapil Sharma Team Steal The Show

The Kapil Sharma Show च्या पहिल्या एपिसोडमध्ये या 5 गोष्टींनी वेधले लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'द कपिल शर्मा शो' 23 एप्रिलपासून छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. कपिलच्या शोसाठी सामान्य प्रेक्षकच नव्हे तर सेलिब्रिटीसुद्धा क्रेझी आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता शाहरुख खानने हजेरी लावली होती. पहिला एपिसोड दिल्लीत शूट झाला होता. अपेक्षेनुसार कपिलच्या शोची छोट्या पडद्यावर ग्रॅण्ड एन्ट्री झाली आहे. पहिल्या एपिसोडमध्ये लक्ष वेधून घेणा-या 5 गोष्टी आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत...
गाण्याने झाली कपिलची धमाकेदार एन्ट्री
कपिल शर्माने 'आँखो के सागर' हे गाणे गाऊन स्टेजवर धमाकेदार एन्ट्री घेतली. कपिलने सर्वप्रथम शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूंचा परिचय करुन दिला. त्यानंतर त्याने आपल्या इतर टीम मेंबर्सची ओळख प्रेक्षकांना करुन दिली. टीमची ओळख करुन देत असताना कपिलने किकू शारदाची चांगलीच खिल्ली उडवली. किकू शारदाला कॉमेडीमुळेच कशी तुरुंगाची हवा खावी लागली, याची आठवण कपिलने यावेळी गमतीशीर अंदाजात सर्वांना करुन दिली. कपिलने किकूला क्रांतिकारी कॉमेडिअन म्हणून संबोधले. इतकेच नाही तर सुमोनाला नेहमीप्रमाणे 'बडे ओठोवाली' म्हणत डिवचले. एकंदरीतच कपिल आणि त्याच्या सर्व टीम मेंबर्सची ग्रॅण्ड एन्ट्री प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरली आहे.

शाहरुख खानची उपस्थिती
कपिलच्या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खान पाहुणा होता. कपिल आणि शाहरुखचा ब्रोमान्स यावेळी मस्त रंगला. शाहरुखने यावेळी कपिलला आपला लहान भाऊ असल्याचे सांगितले. फॅनच्या प्रमोशनसाठी शाहरुख या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी शाहरुखने दिल्लीतील आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. अनेक चाहत्यांनी यावेळी शाहरुखसोबत सेल्फी घेतली. या शोमध्ये शाहरुखचा धाकटा मुलगा अबरामचा उल्लेख झाला. आपल्या घरात मुले हिंदी, मराठी आणि मल्याळम भाषेत बोलत असल्याचे शाहरुखने सांगितले.

सुनील ग्रोवरने दिल्ली पोलिस आणि गौरवच्या भूमिकेतून वेधले लक्ष
सुनील ग्रोवर स्त्री रुपात मंचावर अवतरला. यावेळी त्याने दिल्ली पोलिसाची व्यक्तिरेखा साकारली होती. सुनील आणि कपिलची जुगलबंदी मस्त रंगली. सुनीलने शाहरुखसोबत 'दिलवाले' सिनेमातील 'गेरुआ' या गाण्यावर ताल धरला. शिवाय 'फॅन'मधील गौरवचा गेटअप घेऊन जबरा फॅनवर त्याने शाहरुखसोबत ताल धरला. विशेष म्हणजे यावेळी ताल धरत असताना शाहरुखने सिद्धू यांच्यासोबत दिल्ली ऑडिअन्सला जबरा फॅनच्या गाण्यातील डान्स स्टेप्सही शिकवल्या.
बेगमच्या रुपात अवतरला अली असगर
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोध्ये दादीच्या भूमिकेतून भाव खाऊन गेलेले अली असगर या नव्या शोमध्ये बेगमच्या रुपात अवतरला. जब तक है जान... या सिनेमातील डायलॉग्सची ट्रीट यावेळी बेगम आणि शाहरुख खानकडून प्रेक्षकांना मिळाली.
किकू शारदाचा नवाबी थाट...
बेगमच्या रुपात अली असगरने तर नवाबच्या रुपात किकू शारदाने प्रेक्षकांना पोटधरुन हसवले. या स्किटमध्ये नवाब बेगमच्या अंगावर जेव्हा केक टाकतो, त्या क्षणाने प्रेक्षकांना चेह-यावर हसू फुलवले.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'द कपिल शर्मा शो'च्या पहिल्या एपिसोडची झलक खास छायाचित्रांमध्ये...