आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद होणार कपिलचा शो! सलमान खानचा \'दस का दम\' हा शो जागा घेण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान आणि कपिल शर्मा. - Divya Marathi
सलमान खान आणि कपिल शर्मा.
मुंबई - सलमान खान पुन्हा एकदा 'दस का दम' या गेम शोद्वारे टिव्हीवर पुनरागमन करण्याची शक्यता आहे. यापूर्वी सलमानने दस का दमचे दोन सिझन होस्ट केलेले आहेत. एका वेबसाईटवरील रिपोर्टनुसार सलमानचा हा शो कपिल शर्माच्या शोला रिप्लेस करणार आहे. म्हणजेच कपिलचा शो बंद होणार अशा चर्चा आहेत. सलमान खानची चॅनलसोबत सध्या चर्चा सुरू आहे. चर्चा यशस्वी ठरल्यास जुलै महिन्यात 'दस का दम'चा तिसरा सिझन सुरू होऊ शकतो. 2008 आणि 2009 मध्ये या रियालिटी शोचे दोन सिझन टेलिकास्ट झाले आहेत. 

घसरत्या टीआरपीचा फटका.. 
- सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर आणि अली असगर ने कपिलचा शो सोडल्यापासून या शोचा टिआरपी घसरत चालला आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहणारा हा शो आता टॉप 10 लिस्टच्याही बाहेर पडला आहे. 
- या महिन्याच्या सुरुवातीला चॅनलने कपिलला, शक्य असेल तर शो पुन्हा रुळावर आणण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी कपिलला एका महिन्याचा वेळ दिला होता, असेही सुत्रांनी सांगितले आहे. कपिलने सुनील आणि अलीलला परत आणले नाही तर त्याचा शो बंद होऊ शकतो, असे कपिलला सांगण्यात आले होते. 
- कपिलला मात्र सुनील आणि अलीला परत आणण्यात यश आले नाही. तिघांनी शो सोडल्यापासून कपिलच्या शोचा टिआरपी सतत घसरत चालला आहे. 
- मे महिन्यात कपिलचा चॅनलबरोबर करार संपत आहे. चॅनल पुन्हा करार करण्याच्या तयारीत नसल्याची माहिती मिळत आहे. 

16 मार्चपासून सुरू आहे वाद 
- कपिल शर्माबाबतचा हा वाद 16 मार्चपासून सुरू झालेला आहे. ऑस्ट्रेलिया टूरहून परतताना कपिलने फ्लाइटमध्ये चंदन प्रभाकर आणि सुनील ग्रोवर यांच्याबरोबर गैरवर्तन केले होते. 
- त्यानंतर कपिलचे हे दोन्ही सहकारी पुन्हा शोच्या सेटवर परतले नाही. इतर टीम मेंबर्समध्ये अली असगर, सुगंधा मिश्रा हेही  सुनील-चंदनच्या पाठिशी आहेत, तेही शोपासून सध्या लांब आहेत. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, सुनीलबरोबर नव्या शोची प्लॅनिंग करत आहे चॅनल..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...