आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादी असो किंवा बुआ, प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी असे तयार होतात \'कॉमेडी नाइट्स\'चे पात्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः विनोदवीर कपिल शर्माचा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा शो भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय शो आहे. या शोची लोकप्रियता एवढी आहे, की बॉलिवूडमधील जवळपास सर्वच स्टार्स आपल्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी हमखास या शोमध्ये हजेरी लावत असतात. मेगास्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, करिश्मा कपूर, करीना कपूर, सुशांत सिंह राजपूत, परिणीती चोप्रा, वरुण धवनसह अनेक स्टार्स सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये सहभागी झाले आहेत. शोचा पहिला एपिसोड 22 जून 2013 रोजी ऑनएअर झाला होता.
शोच्या सक्सेसमागचे सहस्य केवळ कपिल शर्माचे कॉमिक पंचच नव्हे, तर यातील पात्र अर्थातच बुआ (उपासना सिंह), बिट्टूची पत्नी मंजू (सुमोना चक्रवर्ती), दादी (अली असगर), पलक/पंखुंडी आंटी (किकू शारदा) आणि घरातील नोकर राजू (चंदन प्रभाकर) हेसुद्धा आहेत. संपूर्ण टीमचे हार्ड वर्क शोमध्ये झळकते.
प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी हे सर्वच कलाकार कठोर परिश्रम घेत असतात. कधी कधी 24/7 या कलाकारांना शूट करावे लागते. अनेक तास तर या कलाकारांना तयार होण्यासाठीच लागतात. Divyamarathi.com तुम्हाला 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या कलाकारांच्या मेकअप सेशनची छायाचित्रे दाखवत आहे.
ही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
नोटः अली असगरने एका मुलाखतीत सांगितले होते, की त्याला केवळ 10 एपिसोड्ससाठी साइन करण्यात आले होते. मात्र शोची लोकप्रियता एवढी आहे, की तो या शोमध्ये टिकून राहिला.