मुंबई- कपिल शर्माचा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' भारतीय टेलिव्हिजनच्या सर्वात लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोची लोकप्रियतेचा अंदाज एका गोष्टीवरून लावला जाऊ शकतो, की बॉलिवूडचे टॉप स्टार्स या शोमध्ये सामील झालेत. या यादीत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमारसारखे अनेक नावाजलेल्या स्टार्सची नावे सामील आहेत. शोचा पहिला एपिसोड 22 जून 2013ला ऑनएअर झाला होता आणि शेवटचा एपिसोड 17 जानेवारी 2016ला.
शोच्या यशामागचे रहस्य कपिल शर्माची कॉमिक पंचच नव्हे तर या शोचे कलाकार बुआ (उपासना सिंह), बिट्टूची पत्नी मंजू (सुमोना चक्रवर्ती), दादी (अली असगर), पलक/पंखुडी आंटी (किकू शारदा) आणि घरातील नोकर राजू(चंदन प्रभाकर), गुत्थी (सुनील ग्रोवर)सुध्दा टीआरपी होते. पूर्ण टीमच्या हार्डवर्कने शोने चर्चेत आला आणि लोकप्रिय झाला.
ऑडियन्सला हसवण्यासाठी या कलकारांनी मोठे कष्ट घेतले होते. कधी-कधी हे सर्व कलाकार 24/7 सुध्दा शूट करत होते. अनेकदा शोच्या पात्रांना मेकअप करण्यासाठी तासन् तास लागत होते. divyamarathi.com तुम्हाला आज 'कॉमेडी नाइट्स...'च्या पात्रांच्या मेकअप सेशनचे काही फोटो दाखवत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कशी मेकअपने बदलली होती कलाकारांची ओळख...