आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Sets Of Sunil ‘Chutki’ Grover’S Mad In India

Revealed: \'चुटकी\'चा शो \'मॅड इन इंडिया\'च्या सेटवरील छायाचित्रे आली समोर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता आणि कॉमेडिअन सुनील ग्रोवर सध्या त्याच्या नवीन शोच्या तयारीत व्यस्त आहे. सुनील त्याच्या 'मॅड इन इंडिया' या कॉमेडी शोमध्ये 'चुटकी'च्या नव्हे तर 'गुत्थी'च्या अवतारात दिसणार आहे. सुनील यापूर्वी 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोमध्ये 'गुत्थी'ची भूमिका साकारली होती. परंतु सुनीलचा शोचा निर्माता कपिल शर्मासोबत वाद झाला होता. त्यानंतर त्याने कपिलचा शो सोडून दिला आणि स्वत:चा शो आणण्याच्या तयारीला लागला.
सुनीलच्या या शोमध्ये डॉली आहलूवालिया आणि मनीष पॉलसुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. 16 फेब्रुवारीला हा शो लाँच होणार आहे. परंतु हा शो लाँच होण्यापूर्वीच त्याची काही छायाचित्रे समोर आली आहेत. सुनीलने याविषयी सांगितले, 'गुत्थी ही चुटकीपेक्षा खूप वेगळी आहे. चुटकी स्वीट, साधी आणि निरागस मुलगी आहे. तुम्हाला ती नक्कीच आवडेल.'
या पॅकेजच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, सुनील ग्रोवरच्या या नवीन शोच्या सेटवरील काही खास छायाचित्रे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा सुनील आणि शोच्या इतर कलाकारांची छायाचित्रे...