आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Tom And Jerry Show Returns With A Fresh Look News In Divya Marathi

टॉम अँड जेरी कार्टून आता नव्या रूपात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जगभरातील लहानांबरोबर मोठ्यांचाही अत्यंत आवडता असलेला ‘टॉम अँड जेरी’ हा कार्टून शो आता नव्या आणि ताज्या रूपात टीव्हीवर दाखल होणार आहे. त्यामुळे बच्चे कंपनीसाठी येत्या 21 एप्रिलपासून टॉम अँड जेरी मनोरंजनाचा खजिनाच घेऊन येणार आहेत. कार्टून नेटवर्कवरच ही मालिका सुरू होणार आहे.

नव्याने सुरू करण्यात येणार्‍या या मालिकेत सगळेच नवीन बदल करण्यात आले आहेत. मात्र, टॉम आणि जेरीची लुटुपुटुची लढाई तशीच ठेवण्यात येणार आहे. एका शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेत टॉम आणि जेरी धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. टॉमची फजिती होणार असली तरी त्यामागील कारणे आणि प्रसंग नवीन असणार आहेत. आताच्या जगात जे बदल घडत आहेत त्यातील प्रसंग शोमध्ये घेतले जाणार आहेत. त्यामुळे थोडक्यात टॉम आणि जेरीच्या लढाईचे स्वरूप लहान मुलांच्या सध्याच्या विश्वाशी जोडले जाणार आहे. आतापर्यंत या मालिकेचे कित्येक वेळा पुनर्प्रसारण केले गेले. मात्र, काळाचे महत्त्व ओळखून त्यात बदल करण्यात आले असल्याने नव्याने प्रसारित होणार्‍या या मालिकेला बच्चे कंपनीची पुन्हा एकदा पसंती मिळेल, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

74 वर्षांनंतरही हिटच
1940 मध्ये जोसेफ बार्बरा आणि विल्यम हॅना यांनी हा कॉर्टून शो सुरू केला होता. अमेरिकन अ‍ॅनिमेशन असलेल्या या मालिकेला त्या काळी कार्टून विश्व बहरात असल्याने अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली होती. सुरुवातीला 1957 पर्यंत या मालिकेच्या 114 भागांची निर्मिती करण्यात आली. या मालिकेने अकॅडमी अ‍ॅवार्डसारखे अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर आजतागायत या मालिकेची गोडी कायम आहे. आता नव्या रूपात येणारी ही मालिका कशी असेल याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.