आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Wedding Celebrations Of Rahul Mahajan's Ex Wife Dimpy Ganguly Begin

राहुल महाजनची Ex-Wife डिंपी थाटतेय दुसरे लग्न, Celebrations झाले सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिंपी गांगुली आपल्या बॅचलरेट पार्टीदरम्यान  (उजवीकडे), डावीकडे रोहित रॉयसोबत (फाइल फोटोज) - Divya Marathi
डिंपी गांगुली आपल्या बॅचलरेट पार्टीदरम्यान (उजवीकडे), डावीकडे रोहित रॉयसोबत (फाइल फोटोज)
कोलकाता: टीव्ही पर्सनॅलिटी राहुल महाजनची पुर्वाश्रमीची पत्नी डिंपी गांगुली हिच्या दुस-या लग्नाच्या सेलिब्रेशन्सना सुरुवात झाली आहे. येत्या 27 नोव्हेंबर रोजी ती दुसरे लग्न करणार आहे. लग्नापूर्वी तिने आपल्या फ्रेंड्ससोबत बॅचलर पार्टी एन्जॉय केली. या पार्टीची छायाचित्रे डिंपीने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. सोबतच तिने आपल्या फ्रेंड्सना धन्यवादसुद्धा दिले आहेत. डिंपीने लिहिले, "Thank you @jaya126in and @neely4u and all my darling friends for the amazing time yesterday. .I'm so glad u were a part of this very special occasion of my life ..love you!"
डिंपीचे लग्न तिचे होमटाऊन असलेल्या कोलकाता येथे दुबईबेस्ड इंजिनिअर रोहित रॉयसोबत होणार आहे. याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता.
'बिग बॉस 8' मध्ये झळकली होती डिंपी
डिंपी गांगुली 'बिग बॉस' या वादग्रस्त शोच्या आठव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या पर्वात तिचा एक्स नवरा राहुल महाजनसुद्धा सहभागी झाला होता. यावेळी दोघांमध्ये जवळीक बघायला मिळाली होती. 2010 मध्ये डिंपी आणि राहुल एका रिअॅलिटी शोमध्ये विवाहबद्ध झाले होते. मात्र लग्नाच्या तीन वर्षांनी म्हणजे 2013 मध्ये दोघे विभक्त झाले. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला.
दुस-या लग्नासाठी नर्व्हस आहे डिंपी
दुस-या लग्नाविषयी डिंपी नर्व्हस आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, ''मी खूप आनंदी आणि सोबत नर्व्हससुद्धा आहे. भावना व्यक्त करणे कठीण होत आहे. माझ्या आयुष्यातील हा खास क्षण मी एन्जॉय करत आहे. आशा आहे, की भविष्यातसुद्धा मी अशीच आनंदी राहिल.''
डिंपीने आपल्या प्री वेडिंग बॅशची छायाचित्रे इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. ती तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...