आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Wedding Diary Of Sanaya Irani And Mohit Sehgal

वरातीपासून रिसेप्शनपर्यंत, टीव्ही स्टार्स सनाया-मोहितचे Wedding Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून लग्न आणि उजवीकडून रिसेप्शनदरम्यान मोहित सहगल आणि सनाया ईराणी - Divya Marathi
डावीकडून लग्न आणि उजवीकडून रिसेप्शनदरम्यान मोहित सहगल आणि सनाया ईराणी
गोवा- टीव्ही स्टार्स सनाया ईराणी आणि मोहित सहगलने सोमवारी (25 जानेवारी) गोव्यात लग्नगाठीत अडकले. हा एक खासगी समारंभ होता. या लग्नसोहळ्यात सनाया आणि मोहितचे कुटुंबीय आणि फ्रेंड्स उपस्थित होते. घोड्यावर स्वार मोहितने बादामी रंगाची शेरवानी आणि नेव्ही ब्लू पगडी परिधान केलेली होती. सनाया गोल्डन आणि रेड लहंग्यात सुंदर दिसत होती. बीच किना-याच्या जवळ दोघांनी लग्नाच्या विधी पूर्ण केल्या.
रात्री झाली रिसेप्शन पार्टी...
रात्री उशीरा गोव्याच्या एका बीचच्या किना-यावर यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित केलेली होती. सनाया व्हाइट गाऊन तर मोहित ब्लॅक tuxedoमध्ये दिसला. वेडिंग सेरेमनीदरम्यान कपलचे क्लोज फ्रेंड्स दृष्टी धामी, वरुण सोबती, राकेश वशिष्ठ, किंशुक महाजन आणि अर्जुन बिजलानीसह अनेक टीव्ही सेलेब्स उपस्थित होते. रविवारी रात्री (24 जानेवारी) संगीत सेरेमनीमध्ये या जोडीने फ्रेंड्ससोबत पार्टी केली.
सेटवर जुळले मन...
सनाया आणि मोहित 2008मध्ये 'मिल जब हम तुम' या टीव्ही शोच्या सेटवर भेटले होते. येथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या मालिकेनंतर सनायाने टीव्ही शो 'इस प्यार को क्या नाम दू'मध्ये 'खुशी' आणि 'रंग रसिया' मालिकेत 'पार्वती'ची भूमिका साकारली होती. तसेच मोहित, 'कबूल है', 'सरोजनी- एक नई पहचान'सारख्या शोमध्ये दिसला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनाया-मोहितच्या लग्नापासून रिसेप्शनपर्यंचे फोटो...
सर्व फोटो- अजित रेडेकर