Home »TV Guide» The Young Lad Aged 31 Ended His Life By Hanging Himself

'सावधान इंडिया'च्या कास्टिंग डायरेक्टरने केली आत्महत्या, गळफास घेऊन संपवले जीवन

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 11:39 AM IST

मुंबई - एकीकडे टीव्ही दिग्दर्शक तलत जानीच्या निधनाने टेलिव्हिजन इंडस्ट्री शोककळा पसरली असतानाच तरुण कास्टिंग डायरेक्टर मनोज नायरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार काल (10 अक्टूबर) मनोजने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण उघड झालेले नाही. मनोजने सुसाइड नोट लिहिलेली नाही.

मोहनन नायर GlamourCalling कंपनीत मनोज कुमार असोसिएट कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत होता. मागील वर्षी त्याने टीव्ही कर्मशिअल आणि टीव्ही कास्टिंग केले होते. याशिवाय त्याने 'सावधान इंडिया' या शोच्या कास्टिंगसाठीही काम केले होते. त्याचे आईवडील मुंबईत दाखल झाले असून मनोजचे पार्थिव केरळ येथे नेण्यात येणार आहे. तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पुढील स्लाईड्सवर बघा, मनोजचे आणखी 2 फोटोज...

Next Article

Recommended