मुंबईः 18 व्या शतकातील मुस्लिम शासक टीपू सुलतान यांची 20 नोव्हेंबर रोजी जयंती आहे. भारताच्या इतिहासात टीपू सुलतानाविषया दोन प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. यापैकी काही गोष्टी 'द सोर्ड ऑफ टीपू सुलतान' या टीव्ही मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या.
गाजलेल्या कादंबरीवर आधारित होती मालिका
1990-91 या काळात टीव्हीवर प्रसारित झालेल्या या मालिकेत संजय खान यांनी टीपू सुलतानची भूमिका वठवली होती. संजय खान आणि अकबर खान यांनी मालिकेचे दिग्दर्शन केले होते. 1990 मध्ये दुरदर्शनवर 60 भागांत मालिका दाखवण्यात आली होती. संजय खानची ही मालिकात भगवान गिडवानी यांच्या 'दि सोर्ड ऑफ टीपू सुलतान' नावाच्या कादंबरीवर आधारित होती. संजय खान यांनी वादापासून दूर राहण्यासाठी केवळ भगवान गिडवानी यांच्या कादंबरीवर आधारित मालिकाच बनवली नाही तर स्क्रिप्टसुद्धा त्यांच्याकडूनच लिहून घेतली होती.
शूटिंगच्या वेळी घडली होती मोठी दुर्घटना
1989 साली जेव्हा मालिकेचे शूटिंग मैसूरच्या प्रीमिअर स्टुडिओत सुरु होते, तेव्हा एक मोठ्या घटनेने खळबळ उडाली होती. 52 व्या एपिसोडसाठी ललित महल पॅलेसमध्ये भव्य सेट उभारण्यात आला होता. मुंबईहून 100 हून अधिक आर्टिस्ट येथे उपस्थित होते. 4 फेब्रुवारी 1989 रोजी उशीरा रात्री टीपू सुलतानच्या लग्नाचा एपिसोड चित्रीत होत होता. त्यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सेटवर आग लागली होती. त्यामध्ये 42 लोकांचा मृत्यू झाला होता. तर संजय खान यांच्यासह 25 लोक गंभीर जखमी झाले होते.
60-65% भाजले होते संजय खान
डॉक्टांनी त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार, संजय खान 60-65% भाजले होते. टीपू सुलतान या मालिकेच्या माध्यमातून संजय खान यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. 3 जानेवारी 1941 रोजी जन्मलेले संजय खान यांनी वयाच्या 49 व्या वर्षी टीपू सुल्तानची भूमिका वठवली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्या लूकमध्ये वयानुसार बराच बदल झालेला दिसून येतो.
1991पासून ते आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 24 वर्षांत किती बदलली 'दि सोर्ड ऑफ टीपू सुलतान'ची स्टारकास्ट... बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...