आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Then&Now: 9 वर्षांत एवढी बदलली 'साराभाई Vs साराभाई'ची Starcast

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रत्ना पाठक)
मुंबईः इंडियन टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काही अशा मालिका होऊन गेल्या, ज्या बघण्यास प्रेक्षक आजही आतुर आहेत. अशीच एक मालिका म्हणजे 'साराभाई Vs साराभाई'. रोशेष साराभाईचा 'मॉम्मा' हा डायलॉग असो, वा माया साराभाईचा 'मोनिशा.. धिस इज सो मिडलक्लास' हा डायलॉग, प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. नोव्हेंबर 2004 मध्ये सुरु झालेली ही विनोदी मालिका प्रेक्षक आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत एन्जॉय करायचे. दोन वर्षांनी म्हणजे मार्च 2006मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल, की साराभाईची क्रेज आजही कायम आहे. ही मालिका ऑफ एअर होऊन आता नऊ वर्षांचा काळ लोटला आहे, मात्र आजही प्रेक्षक ही मालिका ऑनलाइन किंवा यूट्युबवर बघतात.
या प्रसिद्ध मालिकेत सतीश शाह, रत्ना पाठक, सुमित राघवन, रुपाली गांगुली आणि राजेश कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. दिग्दर्शक देवन भोजानी यांनीसुद्धा मालिकेत एक छोटेखानी भूमिका साकारली होती. ही मालिका ऑफ एअर होऊन नऊ वर्षे लोटली आहेत, साहजिकच एवढ्या वर्षांत मालिकेतील कलाकारांच्या लूकमध्येही बराच बदल झाला आहे.
'साराभाई Vs साराभाई' मालिकेतील नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी माया साराभाई हे पात्र साकारले होते. वरील छायाचित्रात तुम्ही गेल्या नऊ वर्षांत रत्ना पाठक यांच्या लूकमध्ये झालेला बदल बघू शकता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, नऊ वर्षांत किती बदलली 'साराभाई Vs साराभाई'ची स्टारकास्ट...