आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 TV अॅक्ट्रेस, कुणी अॅक्टर तर कुणी बिझनेसमनसोबत थाटले दुसरे लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कसौटी जिंदगी की' या मालिकेत प्रेरणाच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी हिने वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. आज म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस आहे. श्वेताची गणना अशा टीव्ही अभिनेत्रींमध्ये होते, ज्यांनी दोनदा लग्न थाटले. श्वेताप्रमाणेच टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या अनेक अभिनेत्रींचे पहिले लग्न अपयशी ठरले आहे. मात्र पहिले प्रेम आणि लग्न अपयशी ठरल्यानंतर या अभिनेत्रींनी झालं गेलं विसरुन नव्याने आयुष्याची सुरुवात केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच दहा टीव्ही अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी दोनदा लग्न केले आहे.
 
श्वेता तिवारी
वयाच्या 19व्या वर्षी (1998मध्ये) श्वेताने राजा चौधरीसोबत लग्न केले होते. मात्र 9 वर्षांत हे नाते संपुष्टात आले. श्वेताने राजावर मारहाण आणि छळ केल्याचा आरोप लावला होता. 2012मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 2013मध्ये श्वेताने 'जाने क्या बात है' मालिकेतील को-स्टार अभिनव कोहलीसोबत संसार थाटला. श्वेता एक मुलगी असून तिचे नाव पलक चौधरी आहे. पलक राजा चौधरीपासून झालेली मुलगी आहे. तर दुसरा पती अभिनवपासून रेयांश हा एक मुलगा आहे. अभिनव एक अभिनेता असून त्याने 'शशश...कोइ है', 'सीआईडी', 'जानें क्या बात हुई' या मालिकांमध्ये काम केले. श्वेताने 'कही किसी रोज' (2001), 'कसौटी जिंदगी की' (2008), 'जानें क्या बात हुई' (2009), 'नागिन' (2007), 'परवरिश' (2013), 'बालवीर' (2014) सह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

श्वेता तिवारीसह अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत, ज्या दोनदा लग्नगाठीत अडकल्या. जाणून घेऊया अशाच टीव्ही अभिनेत्रींविषयी...
 
बातम्या आणखी आहेत...