आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्शी खानवरील टिप्पणी प्रियंक शर्माला घेऊन जाणार लॉक-अपमध्ये? हे कंटेस्टंट्सही गेले घरा बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियंक शर्मा - Divya Marathi
प्रियंक शर्मा
मुंबई - 'बिग बॉस-11' सुरुवातीपासून वादग्रस्त राहिले आहे, विशेषतः प्रियंक शर्मा. आकाश ददलानीला मारहाण केल्यानंतर प्रियंकला शोमधून बाहेर काढण्यात आले होते, मात्र वाइल्ड कार्ड एंट्री देऊन त्याला पुन्हा बिग बॉसने घरात घेतले होते. मात्र आता तो पुन्हा एकदा जेलमध्ये जाणार असे दिसते. हे जेल म्हणजे बिग बॉसची काळकोठडी नसून खरोखरचे जेल. लोनावळा पोलिस स्टेशनचे लॉकअप. 
 
अर्शी खानच्या पीआर कंपनीने दाखल केला खटला...
झाले असे, की प्रियंकविरोधात मॉडेल आणि बिग बॉस कंटेस्टंट अर्शी खानच्या पीआर कंपनीने क्रिमिनल केस दाखल केली आहे. अर्शीच्या गोवा-पुणे येथील केसचा प्रियंकने नॅशनल टीव्हीवर उल्लेख केला होता. त्यानंतर अर्शीच्या पीआर कंपनीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. आता त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाले आहे. पोलिसांनी बिग बॉसच्या घरात घुसण्याची तयारी केली आहे. त्याला अटक झाली तर आता त्याला कोर्टातूनच जामीन मिळवावा लागणार आहे.

आधीही घरातून काढले आहेत कंटेस्टंट्स 
- बिग बॉसच्या घरातून काढण्यात आलेला प्रियंक शर्मा हा काही पहिला कंटेस्टंट नाही. याआधी बिग बॉसच्या घरातून अनेक जणांना काढले आहे. 
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशाच काही कंटेस्टंट्सबद्दल...
बातम्या आणखी आहेत...