आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Pictures Of ‘Chidiya Ghar’ Fame Manish Since His Fatal Accident, Is A Must Watch!

भेटा \'चिडियाघर\'च्या \'मेंढक प्रसाद\'ला, अपघातानंतर गेला होता कोमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीष विश्वकर्मा अर्थातच 'मेंढक प्रसाद' - Divya Marathi
मनीष विश्वकर्मा अर्थातच 'मेंढक प्रसाद'
मुंबई: सब टीव्हीवरील 'चिडियाघर' या लोकप्रिय मालिकेतील 'मेंढक प्रसाद'ची भूमिका साकरणा-या मनीष विश्वकर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील वर्षी 28 जून 2015ला एका अपघातात मनीष गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर मनीष कोमात गेला होता. परंतु मागील 1 वर्षांत त्याच्या प्रकृतीत बराच सुधार झाला आहे. परंतु तो पूर्वीसारखा बोलू शकत नाही.
उपचारासाठी लागले 25 लाख रुपये...
मनीषला उपचारासाठी जवळपास 25 लाखांचा खर्च आला. त्यात 5 ते 6 लाख रुपये त्याच्या इंडस्ट्रीच्या फ्रेंड्सने मिळून दिले होते. अलीकडेच divyamarathi.comच्या टीमने मनीषच्या फॅमिलीसोबत बातचीत केली. यादरम्यान मनीषचा थोरला भाऊ आशिषने सांगितले, 'मनीष यातून बचावला हे एखाद्या चत्कारापेक्षा कमी नाहीये. कारण मोठ-मोठ्या डॉक्टर्सनेसुध्दा अपेक्षा सोडली होती. काही मेडीकल रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले होते, की मनीषचे काही अवयव पॅरालाइज्ड झाले आहेत. परंतु आम्ही आशा सोडली नाही. मागील एक महिन्यापासून आम्ही मनीषला आयुर्वेदीक उपचार सुरु केले आहेत आणि सुदैवाने त्याच्यात सुधार होतोय. मनीष स्वत:सुध्दा खूप प्रयत्न करतोय. मात्र, तो अद्याप उभा राहू शकत नाहीये. परंतु त्याचा प्रयत्न पाहून आम्ही आनंदी आहोत. आशा आहे, की पुढील दोन महिन्यात मेंढक प्रसाद पुन्हा स्क्रिनवर दिसेल.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मनीषचे फॅमिलीसोबतचे खास PHOTOS...