('दीया और बाती हम'ला 3 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सेलिब्रेशनमध्ये क्लिक झालेली छायाचित्रे)
मुंबई - स्टार प्लस वाहिनीवरील 'दीया और बाती हम' या मालिकेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. 29 ऑगस्ट 2011 रोजी ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली होती. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळवली.
मालिकेला यशस्वी तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लीड अॅक्टर्स अनस राशिद आणि दीपिका सिंह यांनी संपूर्ण कास्ट आणि क्रू मेंबर्ससह सेटवर केक कापला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिझी शेड्युलमुळे मालिकेची टीम मोठे सेलिब्रेशन करु शकली नाही, त्यामुळे सेटवर एक छोटेसे सेलिब्रेशन आयोजित करण्यात आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये सेलिब्रेशनच्या वेळी सेटवर क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...