आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसची क्लोज फ्रेंड होती प्रत्युषा, आता टीव्ही सीरिअल्समध्ये साकारणार आईची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आपल्या बिनधास्त अॅटिट्यूडसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी लवकरच एका नव्या मालिकेत दिसणार आहे. 'शक्ति : अस्तित्व के अहसास की' हे काम्याच्या नव्या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत काम्या 'मधुबाला' या मालिकेत झळकलेला अभिनेता विवियन दसेनाच्या आईची व्यक्तिरेखा साकारणार आहे. काम्या चॅलेंजिंग भूमिका स्वीकारण्यावर विश्वास ठेवते. याच कारणामुळे कमी वयातच तिने आईची व्यक्तिरेखा साकारण्यास होकार दिला आहे.

विवियन आणि मी मुलगा-आई नव्हे कपल दिसतो...
एका मुलाखतीत काम्या म्हणाली, "ऑनस्क्रिन माझ्यासाठी वय नव्हे तर भूमिका महत्त्वाची असते. नशिबाने मला नेहमीच चांगल्या भूमिका मिळत आल्या आहेत. यावेळी मला या भूमिकेच ऑफर आली, तर मी लगेचच तयार झाले. विवियन आणि मी आई-मुलगा नव्हे तर कपल प्रमाणे दिसतो. मात्र तरीदेखील मी हे चॅलेंज स्वीकारले आहे. या मालिकेत विवियनची जोड रुबिना दिलाइकसोबत जमली आहे. ही मालिका दोन बहिणींच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्या एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतात."

पुढील स्लाईड्समध्ये बघा काम्या पंजाबीची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...