आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्माने हिंदू, पण मागील 2 वर्षांपासून रोजे ठेवतेय ही अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माही विज - Divya Marathi
माही विज
मुंबई: माही विजने अलीकडेच रोजा इफ्तारचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात ती इफ्तार करताना दिसत आहे. यावरून असे दिसते, की ती एका इफ्तार पार्टी गेली होती. माहीने सांगितले, की तिला मागील दोन वर्षांपासून एकसुध्दा रोजा सोडला नाहीये. ती सकाळी उठून सेहरी करते आणि संध्याकाळी इफ्तार. संपूर्ण रमजानमध्ये एक दिवससुध्दा असा गेला नाही, ज्यादिवशी तिचा रोजा सुटला.
मनाला शांती मिळते...
माही सांगते, 'मला वाटते, की देवाला माझ्याकडून ही इच्छा आहे. रोजे ठेवल्यास माझ्या मनाला शांती मिळते.' माहीला प्रश्न विचारला, की ती कोणत्या धर्माला मानते. यावर तिने आश्चर्यकारक उत्तर दिले. माही विजविषयी इंटरनेटवर सर्च केल्यास ती हिंदू धर्माची असल्याचे दिसले. परंतु ती म्हणते, की मी कोणताच धर्म मानत नाही. सिख धर्मात मानल्या जाणा-या चालियादरम्यान सुध्दा (40 दिवसांचा उपवास) ती उपवास करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा माही विजचे ग्लॅमरस PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...