आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sankat Mochan Mahabali Hanuman: This Is How Ishant Bhanushali Turns Bal Hanuman

Behind The Scenes: 7 वर्षांचा खोडकर इशांत, शोसाठी असा बनतो \'बाल हनुमान\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('संकट मोचन महाबली हनुमान'च्या सेटवर बालकलाकार इशांत भानुशाली)
मुंबईः बालकलाकार इशांत भानुशाली सध्या आपल्याला 'संकट मोचन महाबली हनुमान' या मालिकेत बाल हनुमानाच्या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेसाठी इशांतचे खूप कौतुक होत आहे. मात्र हे रुप धारण करणे सोपे काम नाहीये. dainikbhaskar.com सोबत बातचित करताना इशांतने सांगितले, की हनुमानचा लूक घेण्यासाठी अनेक तास लागतात. तो म्हणतो, "आता हे डेली रुटीन बनले आहे. सुरुवातीला थोडे कंटाळवाणे वाटत होते. बाल हनुमानाची भूमिका रंजक असून ती करताना खूप मजा येते. हनुमान कधीचा मोठा होऊ नये, असे मला वाटते. कारण तेव्हा मी या मालिकेत नसेल."
इशांत सात वर्षांचा आहे. एवढ्या कमी वयातच त्याला वेळेची शिस्त आहे. सेटवर उशीरा पोहोचणे त्याला पसंत नाही. शाळेला सुटी होती, तेव्हा तो सकाळी नऊ वाजता सेटवर हजर राहायचा. तो येताच मेकअप मॅन आणि हेअरड्रेसर त्याला हनुमानाच्या रुपात तयार करत होते. इशांत सांगतो, "मला मेकअप खूप पसंत आहे. बाल हनुमानाच्या भूमिकेसाठी मला डार्क मेकअप करावा लागतो आणि मेकअप आर्टिस्ट त्यांचे काम खूप सफाइदारपणे करतात. मला विग घालावा लागतो. शिवाय दागिने घातले जातात."
हनुमानाच्या भूमिकेसाठी सिलेक्ट होण्यापूर्वी इशांतने भरपूर ऑडीशन्स दिल्या आहेत. याविषयी तो सांगतो, "अनेक मालिकांसाठी मी ऑडीशन्स दिल्या. मात्र अनेका अपयशी ठरलो. जेव्हा या भूमिकेसाठी ऑडीशन दिली, तेव्हा मी खूप घाबरलो होतो. या मालिकेच्या माध्यमातून मी प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करत राहिल."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'संकट मोचन महाबली हनुमान'च्या सेटवर इशांतची मेकअप रुममधील खास छायाचित्रे...
सर्व फोटोजः अजीत रेडेकर