आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: गोव्यात पोहोचून भारतीच्या लग्नाला गेला नाही कपिल, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्मा. हर्षसोबत भारती सिंह. - Divya Marathi
कपिल शर्मा. हर्षसोबत भारती सिंह.

मुंबई - कॉमेडियन कपिल शर्मा रविवारी भारती सिंहच्या लग्नासाठी गोव्यात आला होता. मात्र कपिल लग्नाला पोहोचला नाही. आता अशी माहिती समोर येत आहे की भारतीच्या लग्नात आणखी एक कॉमेडियन आला असल्याचे कपिला कळाले आणि गोव्यात जाऊन त्याने लग्नाला जाणे टाळले. भारतीच्या लग्नाच्या इव्हेंट कंपनीच्या सूत्रांनी DainikDainikBhaskar.com ला दिलेल्या माहितीनुसार, कपिल रविवारी सकाळीच गोव्यात पोहोचला होता. मात्र त्याला जेव्हा कळाले की सुनील ग्रोव्हरही लग्नाला आला आहे, तेव्हा लग्नाला हजेरी न लावताच कपिलने गोव्यातून काढता पाय घेतला. 

सुनीलही लग्न आणि रिसेप्शनला दिसला नाही.. 
- कपिल लग्नात कुठेच दिसला नाही, मात्र सुनील ग्रोव्हरही भारतीच्या लग्नात आणि रिसेप्शनला दिसला नाही. तसे पाहाता सुनील शनिवारी गोव्यात पोहोचला होता आणि भारती-हर्षच्या कॉकटेल पार्टीला त्याने हजेरी लावली होती. दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी झालेल्या लग्न आणि रिसेप्शनला मात्र त्याने दांडी मारली होती. 
- सूत्रांनी सांगितल्यानुसार, सुनील दोन दिवसांसाठी (शनिवार-रविवार) गोव्यात आला होता. तो भारतीच्या लग्नाचे सर्व फंक्शन अटेंड करणार होता. मात्र जेव्हा त्याला कळाले की रविवारी कपिलही भारतीच्या लग्नासाठी आला आहे तेव्हा सुनीलने दुसऱ्या दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आणि मुंबईला परत गेला. 

 

अखेर का कपिल-सुनील टाळत होते एकमेकांना 
- 16 मार्चरोजी द कपिल शर्मा शोची टीम ऑस्ट्रेलियाहून मुंबईला परत येत होती. यावेळी फ्लाइटमध्ये कपिल आणि सुनील यांच्यात भांडण झाले होते. अशीही माहिती आहे की कपिलने सुनीलला शिवीगाळ करत त्याच्यावर हात देखील उचलला होता. 
- तेव्हापासून या दोघांच्या मैत्रित वितुष्ट आले आणि सुनील ग्रोव्हरने कपिलचा शो सोडला. 
- कपिलने फ्लाइटमध्ये एकट्या कपिलसोबतच भांडण केले नाही तर त्याचा मित्र चंदन प्रभाकरसोबतही त्याचे भांडण झाले. सुनीलने चंदनची बाजू घेतल्यामुळे कपिल चिडला होता. यानंतर एकट्या सुनीलने शो सोडला नाही तर चंदन आणि अली असगर यांनीही कपिलच्या शोला रामराम ठोकला होता. 
- या नंतर कपिलने माझ्याकडून चूक झाली असे म्हटले होते. त्याने सोशल मीडिया आणि फोनवरुन सुनीलची माफीही मागितली होती. मात्र त्यानंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसली नाही. 
- कपिल शर्माचा नुकताच फिरंगी रिलीज झाला आहे. त्याआधी DainikDainikBhaskar.com ला त्याने सांगितले होते की आमच्या दोघांमध्ये (कपिल आणि सुनील) कोणताही वाद नाही. 
आमची भेट झाली नसली तरी चॅटच्या माध्यमातून आम्ही संपर्कात असतो.  मीही माणूस आहे, माझ्याकडून चूक झाली होती. त्याबद्दल मला दुःख आहे, असे सांगत कपिल म्हणाला होता की मला आशा आहे की आम्ही पुन्हा एकत्र येऊ. 

 

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या भारती आणि कपिलचे नाते... 

बातम्या आणखी आहेत...