आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिना खान नव्‍हे तर टीना दत्‍ता बनणार 'सेक्‍स वर्कर', रिअल लोकेशनवर होणार शूटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक दिवसांपासून रश्‍मी शर्माची नवी डेलीसोप 'तवायफ'मध्ये टीव्‍हीची फेव्‍हरेट बहू हिना खान 'सेक्‍स वर्कर'ची भूमिका साकारणार असल्‍याची चर्चा होती. या भूमिकेद्वारे ती टीव्‍हीमध्‍ये कमबॅक करणार असल्‍याचेही बोलले जात होते. मात्र हे सर्व खोटे ठरले आहे. या शोमध्‍ये हिना खान ऐवजी 'उतरण'फेम टीना दत्‍ता आता हा रोल करणार आहे. तसेच या शोचे नावही बदलण्‍यात आले असून ते 'मीना बाजार' ठेवण्‍यात आले आहे. 
 
या अभिनेत्रींनीही दिली होती ऑडीशन 
या शोची मेकर रश्‍मी शर्मा अनेक दिवसांपासून या चॅलेजिंग रोलसाठी चांगल्‍या चेह-याच्‍या शोधात होती. हिना  खानला साईन करता यावे म्‍हणून त्‍यांनी अनेकदा प्रयत्‍न केला. मात्र हिना खाने बिग बॉसमध्‍ये सहभागी होण्‍यास पसंती दिली. या रोलसाठी अनेक अभिनेत्रींनी ऑडीशन दिल्‍याचे सांगितले जात आहे. यामध्‍ये सलमानची कोस्‍टार स्‍नेहा उल्‍लाल हीचाही समावेश आहे. स्‍नेहा व्‍यतिरिक्‍त नेहा पेंडसे, रति पांडे यांनीही ऑडीशन दिली होती. मात्र शेवटी टीना दत्‍ताचे नाव रोलसाठी फायनल करण्‍यात आले. 
 
पुढील स्‍लाइडवर अधिक जाणुन घ्‍या, शो आणि टीना दत्‍ता विषयी... 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...