आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रिअल लाइफमध्ये असे एन्जॉय करते TV ची इच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : इच्छा उर्फ टीना दत्ता आपल्या एका फ्रेंडसोबत)
मुंबईः छोट्या पडद्यावर गाजलेल्या 'उतरन' या मालिकेत 'इच्छा' हे पात्र साकारणारी अभिनेत्री टीना दत्ता रिअल लाइफमध्ये पार्टी गर्ल आहे. असे आम्ही म्हणत नाहीये, तर तिच्या फोटोजवरुन हे लक्षात येतंय. अलीकडेच टीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत. इच्छाच्या भूमिकेत नेहमी साडीत दिसलेली टीना खासगी आयुष्यात मात्र जितके होईल तितके ग्लॅमरस दिसण्याचा प्रयत्न करते. टीव्हीची साधीसरळ इच्छा खासगी आयुष्यात स्विमिंगपासून ते मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी घेण्यापर्यंत, मजामस्तीची एकही संधी हातून जाऊ देतन नाही.
वयाच्या पाचव्या वर्षी सुरु केली अॅक्टिंग
टीना वयाच्या पाचव्या वर्षापासून टीव्ही इंडस्ट्रीशी जुळली आहे. 'सिस्टर निवेदिता'(1992) या मालिकेत ती पहिल्यांदा झळकली होती. त्यानंतर तिने 'पिता मात्र संतान', 'दस नंबरी' आणि 'सागर कन्या' या मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. वयाच्या 16 व्या वर्षी 'चोकर बाली' या सिनेमात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन मेन लीडमध्ये होती. त्यानंतर 2005 मध्ये 'परिणीता' या सिनेमात टीनाने विद्या बालनसोबत काम केले. त्यानंतर 'उतरन' आणि 'कोई आने को है' या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, टीना दत्ताने अलीकडेच इंस्टाग्रामवर शेअर केलेली खास छायाचित्रे...