आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 5 Controversies Of Gautam Gulati In Bigg Boss House

डिआंड्राच्या प्रेग्नेंसीपासून ते बाथरुममध्ये बंद होण्यापर्यंत, वाचा गौतमचे 5 वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- गौतम आणि डिआंड्रा)
मुंबई- मॉडेल आणि टीव्ही पर्सनॅलिटी डिआंड्रा सॉरेस या आठवड्यात 'बिग बॉस'मधून बाहेर झाली आहे. अलीकडेच, बातमी आली होती, की डिआंड्राला तिच्या प्रेग्नेंसीमुळे घराबाहेर काढण्यात आले आहे. ती गौतम गुलाटीपासून प्रेग्नेंट असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांत डिआंड्रा आणि गौतम खूपच जवळ आले होते. त्यांना अनेकदा बाथरुममध्ये बंद झालेलेसुध्दा पाहिले होते.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, गौतमपासून डिआंड्रा प्रग्नेंट झाली आहे. मात्र, एविक्शननंतर डिआंड्राने प्रेग्नेंसीच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. डिआंड्रा म्हणाली, ती हॉस्पिटलमध्ये रुटीन चेक-अपसाठी गेली होती. आता यात किती सत्यता आहे, हे गौतम, डिआंड्रा आणि प्रॉडक्शन हाऊस यांनाच ठाऊक आहे.
जर डिआंड्रा प्रेग्नेंट असेल, तर गौतमच्या खात्यात आणखी एक नवीन वोद जोडला गेला आहे. गौतम जेव्हा 'बिग बॉस'मध्ये आला होता तेव्हापासून वादात अडकला आहे. चला एक नजर टाकूया गौतमच्या टॉप 5 विवादांवर...
करिश्मा तन्नाविषयी अभद्र शब्दांचा वापर-
'बिग बॉस'च्या सुरुवातीलाच गौतम आणि करिश्मा यांच्यात जोरदार भांडण झाले होते. 'बिग बॉस'ने घरातील सदस्यांना लग्जरी बजेट टास्क दिला होता. यावेळी गौतम चेअरवर बसलेला होता आणि करिश्मा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी गौतम उठला नाही म्हणून करिश्माने त्याच्या तोंडावर मिरची पावडर फेकली. गौतम या कृत्या करिश्मावर ओरडला. एवढेच नव्हे, गौतमने करिश्माविषयी अपशब्दांचा वापरदेखील केला होता. त्यामुळे दोघांत जोरदार भांडण झाले होते. मात्र काही दिवसांनी गौतमने करिश्माची माफी मागितली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा गौतम गुलाटीच्या संबंधित वाद...