आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृप्ती देसाई शनी शिंगणापूर, हाजीअलीनंतर जाणार Bigg Boss च्या घरात, पण..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी राज्यभर तसेच न्यायालयीन पातळीवर लढा देणाऱ्या ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई आता रिअॅलिटी शो “बिग बॉस’मध्ये दिसण्याची शक्यता आहे. मात्र, या शोचे सूत्रसंचालन महिलेकडे देण्यात आले तरच आपण यात सहभागी होण्याचा विचार करू, अशी अट त्यांनी अायाेजकांना घातली अाहे.

‘बिग बॉस’चा १० वा सीझन पुढील महिन्यात सुरू होणार आहे. यासाठी आपल्याला कलर्स वाहिनीकडून विचारणा करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. देसाई म्हणाल्या, गेल्या नऊ सीझनमध्ये या शोचे सूत्रसंचालन एक पुरुष करत आहे. मात्र, यावेळेस महिलेचा अावाज दिल्यास आपण सहभागी होऊ. हा बदल करणे चॅनेलला जमणार नाही, असेही मला वाटत असल्याचेही देसाई यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले.

‘आम्ही महिलांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याची दखल बिग बॉसनेही घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मला चॅनेलकडून शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आली. गेल्या महिन्यात याबाबत एक बैठकही झाली. मात्र, या शोमध्ये सहभागी झाल्यास ९० दिवस बिग बॉसच्या घरात राहावे लागते. बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क ठेवता येत नाही, असे त्यांनी मला सांगितले. माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. जर तारखा मिळाल्या तर शोमध्ये सहभागी होण्याचा विचार करू. मात्र, शोमध्ये महिलेच्या आवाजाची अट त्यांच्यासमोर ठेवली आहे. त्यांना यावर विचार करण्यास सांगितले अाहे,’ असेही देसाई म्हणाल्या.
कोण आहेत तृप्ती देसाई
- 12 डिसेंबर 1984 रोजी तृप्ती देसाई यांचा जन्म झाला.
- मुंबईच्या विद्या विकास विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.
- मुंबईच्या एसएनडीटी विद्यापिठात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले.
- इंडिया अग्नेन्स करप्शनसाठी त्यांनी काम केले. अजित बॅंक संघर्ष समितीच्या, समाज सुरक्षा कृती समितीच्या, भूमाता ब्रिगेड या समाजसेवी संस्थेच्याही त्या अध्यक्षा आहेत.
- सध्या त्या पुण्याला राहतात. त्यांच्या पतीचे नाव प्रशांत देसाई आहे. 29 सप्टेंबर 2006 रोजी त्यांचे लग्न झाले.
- तृप्‍ती देसाई यांचा विविध सामाजिक आंदोलनामध्‍ये सहभाग राहिला आहे.
- बुडित अजित सहकारी बँक ठेवीदारांच्‍या आंदोलनामुळे त्‍या चर्चेत आल्‍या होत्‍या.
- 2012 मध्‍ये तृप्‍ती देसाई यांनी कॉंग्रेसच्‍या तिकिटावर पुणे महापालिका निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला.
- शनी शिंगणापूरच्‍या महिला मंदीर प्रवेश आंदोलनामुळे त्‍या पुन्‍हा प्रकाश झोतात आल्‍या.
दिल दिया है जान भी देंगे.... आहे कॉलर ट्यून....
- तृप्ती देसाई यांची कॉलर ट्यून आहे, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिये...
- सुभाष घई यांच्या कर्मा या चित्रपटातील गाण्याची कॉलर ट्यून आहे.
- तृप्ती देसाई मुळच्या कोल्हापूरच्या आहेत.
- एसएनडीटीतील होम सायन्स या अभ्यासक्रमाला त्यांनी प्रवेश घेतला होता. पण काही घरगुती समस्यांमुळे त्यांना डॉप आऊट व्हावे लागले. पण दूरस्त शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी एका मुक्त विद्यापिठातून कला शाखेत पदवी घेतली आहे.
- 2010 मध्ये त्यांनी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली. आता या संस्थेचे महाराष्ट्रात तब्बल 4000 सदस्य आहेत.
- नोव्हेंबर 2015 मध्ये एका महिलेने शनि शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर बळजबरी प्रवेश करुन पूजा केली होती. त्यानंतर प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तेव्हापासून भूमाता ब्रिगेड प्रवेशासाठी आक्रामक राहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार पुढील महिन्यात भेट....
- पुढील महिन्यात देसाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महिलांसाठी 'अच्छे दिन' यावे यासाठी केंद्र सरकारने संसदेत विधेयक आणावे, अशी मागणी त्या करणार आहेत.
- विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना पत्नींना भेटण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. या महिलांचे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत.
- मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. मला पुन्हा राजकारणात जायचे नाही. सगळे राजकीय पक्ष केवळ राजकीय स्वार्थासाठी काम करतात, असे त्यांचे मत आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, तृप्ती देसाईंनी काय अट ठेवली आहे बिग बॉससमोर...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...